Home हिंदी जागतिक अंध दिन विशेष: काठीचा रंग पांढराच कसा?

जागतिक अंध दिन विशेष: काठीचा रंग पांढराच कसा?

817

नागपूर ब्यूरो : सम्पूर्ण जगात १५ ऑक्टोबर जगतिक अंध दिवस (पांढरी काठी सुरक्षा दिन) म्हणून साजरा करण्यत येतो. रस्ता ओलांडताना, चालताना पूर्ण पांढर्‍या रंगाची किंवा वरून दोन तृतींयांश पांढरा आणि खाली एक तृतीयांश लाल रंग असलेली काठी घेऊन चालणारे अनेक लोक पाहिले असतील. हे अंध असतात. पांढरी काठीच्या मदतिने चढउतार, दगडधोंडे, खाचखळगे, कुत्रे, मांजर असे प्राणी, बसलेली-झोपलेली माणसे असे काठीच्या परीक्षेत्रात येणारे सगळेच अडथळे पार करता येतात.

डॉ. रिचर्ड व्हुव्हर यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धा नंतर सर्वप्रथम अंधांना चालण्या फिरण्यासाठी विशिष्ठ काठी तयार केली. ती काठी हुव्हर केन म्हणून ओळखली गेली. १९२१ मध्ये मध्ये ब्रिस्टलचे फोटोग्राफर जेम्स विंग्ज यांना अपघातात अंधत्व आले. तेव्हा गडद रंगांच्या काठय़ा घेऊन फिरताना वाहनचालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणे कठीण जाते. हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल, असा पांढरा रंग आपल्या काठीला दिला.