Home हिंदी खंडित वीज पुरवठ्यामागे घातापाताची शक्यता

खंडित वीज पुरवठ्यामागे घातापाताची शक्यता

486
0

ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी वर्तवली शक्यता

मुंबई : मुंबई व ठाणे येथे सोमवारी वीज पुरवठा होण्यामागे खंडित घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितिन राऊत यांनी आज दिली.

कळवा पडघे 400 के व्ही वीज वहिनीत 12 ऑक्टोबर रोजी अचानक तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होऊन मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या उपनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे डॉ राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई शहर अंधारात जाणे ही साधीसुधी घटना नाही. यापूर्वी 2011 मध्ये अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित झाला होता. यावर एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना सुचविलेल्या होत्या. त्यावर अंमलबजावणी झाली किंवा नाही हे तपासून बघण्यात येणार आहे, यासाठी कृती अहवाल (एटीआर) मागवला आहे, अशी माहिती डॉ राऊत यांनी दिली.

या घटनेची चौकशी करताना सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात येणार असून वीज सुरक्षा साधनांची व उपाय योजनांचे ऑडिट करण्यात येणार आहे. लवकरच यावर अहवाल सादर करण्यात येणार आहे. काही लोक ऊर्जा खात्याला बदनाम करायचं काम करत आहे, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले.

मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या उपनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे डॉ राऊत यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने सुद्धा यावर एक समिती नेमली आहे. ही समिती ही सध्या मुंबईच्या भेटीवर असून वीज पुरवठा ठप्प होण्यामागील कारणांचा शोध घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here