Home हिंदी पोलीस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या 65 युवक-युवतींना साहित्य वाटप

पोलीस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या 65 युवक-युवतींना साहित्य वाटप

644

गडचिरोली ब्यूरो : आगामी पोलीस भरती साठी तयारी करणाऱ्या राजाराम (खा) उप पोलीस स्टेशन हद्दीतील 65 युवक-युवतींना जनसंघर्ष समिती नागपुर व गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. पोलिस दलातर्फे जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना या साठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

येणाऱ्या काही दिवसात पोलीस भरती होणार आहे त्या भरती साठी गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील युवक-युवती साठी मोठ्या प्रमाणात भरती पूर्व प्रशिक्षण सुरू केले.मात्र, जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य खरेदी करता येत नसल्याने जनसंघर्ष समिती नागपूर आणि गडचिरोली पोलीस विभागाच्या पुढाकाराने राजाराम पोलीस स्टेशन हद्दीतील 65 युवक-युवतींना शूज, टी शर्ट, लोवर आदी साहित्य वाटप करण्यात आले.


दुर्गम भागातील युवकांसाठी गडचिरोली पोलिसांचा स्तुत्य उपक्रम


त्यामुळे या युवक-युवतींना भरती पूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी सोयीस्कर झाले आहे. सदर कार्यक्रम पोलीस अधिक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे तसेच जनसंघर्ष समिती नागपूरचे अध्यक्ष दत्ता शिर्के, उपाध्यक्ष रितेश बळवाही, श्रुती आष्टनकर , पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, गणेश कड, एसआरपीचे अधिकारी कर्मचारी व जिल्हा पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई यांनी युवक व युवतींना आगामी होणाऱ्या पोलीस भरती बाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमानंतर पोलीस भरतीची तयारी करणारे युवक व युवतींनी गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleकोव्हिडला घाबरू नका, फक्त सतर्क राहा!
Next articleमंदिर खोलने भाजपा का मंदिरों के सामने आंदोलन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).