Home हिंदी पॉजिटिव्ह न्यूज : 93 वर्षाच्या वृध्दाने केली कोरोनावर मात

पॉजिटिव्ह न्यूज : 93 वर्षाच्या वृध्दाने केली कोरोनावर मात

738

नागपूर ब्यूरो : नागपुर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर मधून शुक्रवारी 93 वर्षाचे पदमाकर चवडे कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सहज मात करता येते असे पदमाकर चवडे यांनी दाखवून दिले आहे. पदमाकर चवडे यांना कोव्हीड – 19 चे लक्षणे दिसल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मेयो रुग्णालयामध्ये 7 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर येथे भरती करण्यात आले.

आई.जी.आर मध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉ. हरदास यांनी सांगितले की, त्यांना आॅक्सीजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि त्यांना शुक्रवारी सुटटी देण्यात आली. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी 100 हून अधिक बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केल्या जात आहे. सध्या 41 रुग्ण इथे उपचार घेत आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आई.जी.आर चे डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन केले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).