Home हिंदी नागपूरच्या चार मेट्रो स्टेशनला ‘सीएमआरएस’ चे प्रमाणपत्र

नागपूरच्या चार मेट्रो स्टेशनला ‘सीएमआरएस’ चे प्रमाणपत्र

755

आता 12 नव्हे 16 स्टेशन वरून सुटणार नागपुर मेट्रो

नागपूर ब्यूरो : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरीही याच लॉकडाऊनच्या काळात महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशन निर्माण कार्य पूर्ण केले. रहाटे कॉलनी, अजनी चौक, बंसी नगर आणि एलएडी मेट्रो स्टेशन देखील आता अनलॉक होण्यास सज्ज झाले असून रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांनी या चारही मेट्रो स्टेशनातून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधी प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

जनक कुमार गर्ग यांनी (रिच 1 ऑरेंज -अ‍ॅक्वा लाईन) अंतर्गत असलेल्या अजनी चौक व रहाटे कॉलनी तसेच (रिच 3 ऑरेंज अ‍ॅक्वा लाईन) येथील एलएडी चौक तसेच बंसी नगर मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करत स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरता असलेल्या विविध सुविधांचे निरीक्षण केले होते. स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधा सोबत संरक्षा व सुरक्षेचा आढावा घेत सीएमआरएस पथकाने समाधान व्यक्त केले होते.

अजनी चौक, रहाटे कॉलनी, एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्थानकांचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे नव्याने मेट्रो सेवा सुरु होईल तेव्हा शहरात 12 मेट्रो स्टेशन ऐवजी आता 16 मेट्रो स्टेशन (ऑरेंज लाईन वर 8 आणि अ‍ॅक्वा लाइन वर 8 स्टेशन) वरून मेट्रो सेवा सुरु होऊ शकेल.

व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित यांनी मानले आभार
रहाटे कॉलनी, अजनी चौक, बंसी नगर आणि एलएडी चौक मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधी सीएमआरएस यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी कठीण परिस्थितीवर मात करीत केलेल्या निर्माण कार्याबद्दल सर्व कामगार, निर्माण कार्यस्थळी असलेले कर्मचारी, अधिकारी यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous article‘बाहुबली’ प्रभास की फिल्म में नजर आएंगे ‘बिग बी’
Next articleपॉजिटिव्ह न्यूज : 93 वर्षाच्या वृध्दाने केली कोरोनावर मात
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).