Home हिंदी माझे कुटुंब, माझी जबाबदारी: 8 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण

माझे कुटुंब, माझी जबाबदारी: 8 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण

827

मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात 8 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण सुमारे 24 लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसेच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या असे सांगीतले.

सर्वेक्षण झालेल्या लोकसंख्येत पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले. ठाणे भागामधून 21 टक्के , नाशिक भागामधून 10 टक्के, पुणे 18 टक्के, कोल्हापूर 15 टक्के, औरंगाबाद 12 टक्के, लातूर 13 टक्के, अकोला 13 टक्के आणि नागपूर भागामधून 6 टक्के इतक्या कुटुंबांचे सर्व्हेक्षण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सुचना केल्या. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleWorld Heart Day : 29 सितंबर को इस वजह से मनाया जाता है ‘वर्ल्ड हार्ट डे’
Next articleकोविड-19 : नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा -गृहमंत्री अनिल देशमुख
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).