Home हिंदी कोविड-19 : कोरोनाला पळवण्यासाठी “वाटेल ते देशी जुगाड”

कोविड-19 : कोरोनाला पळवण्यासाठी “वाटेल ते देशी जुगाड”

923

सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे. आकडे सुद्धा वेगाने वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आपल्याला संसर्ग होवू नये म्हणून लोकं वेगवेगळ्या पद्धतीने आपली काळजी घेत आहेत. यात देशी जुगाडं देखील कमी नाहीत. आयुर्वेदिक काढा घेतल्याने कोरोना होत नाही, अशी नागरिकांची समजूत आहे. आता तर वाफ घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचा दावा सोशल मीडिया तून करण्यात येत आहे. त्यामुळे वाफ घेण्याचे “वाटेल ते देशी जुगाड” तयार व्हायला लागले आहेत.

 

या वाफेसंदर्भातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. स्टोव्ह, प्रेशर कुकर आणि काही पाईप्स वापरुन एका व्यक्तिने एक वाफ घेण्याचं मशीन बनवलं आहे. या मशीनद्वारे काही लोक वाफ घेत असल्याचं दिसून येत आहे. काही यूझर्सनी हा व्हिडीओ पुण्याचा असल्याचा दावा केला आहे तर काहींनी अहमदाबादचा. या देशी जुगाडातून बनलेल्या मशीनमधून वाफ घेण्यासाठी 5 मिनिटांसाठी दहा रुपये आकारले जात असल्याचा दावा देखील केला जात आहे.


डॉक्टर म्हणतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज  7 ते 8 तास झोप, दररोज पौष्टिक आहार, तणावमुक्त जीवनशैली (lifestyle) हाच एकमेव उपाय आहे.


कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग करत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घेण्यापासून श्वासोच्छवासाच्या व्यायाम करणे असे अनेक प्रयोग होत आहेत. यात आता स्टीम म्हणजे वाफ घेण्याचे प्रयोग वाढले आहेत. याबाबत डॉक्टर म्हणतात की, वाफ घेतल्याने 60 डिग्री सेल्सिअसमध्ये व्हायरस कमजोर होतो. आजच्या कोरोना काळात स्टीम घेणे गरजेचे आहे. स्टीम घेतल्याने नाक मोकळं होतं, श्वासोच्छास प्रक्रिया सुलभ होते. नाकात व्हायरस असेल तर तो नष्ट होण्यास मदत होते।दिवसातून एकदा तरी वाफ घ्यावी. कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांनी घरी आल्यावर तर नक्की वाफ घ्यावी, तसेच सर्दीचा त्रास असलेल्या लोकांनी या काळात दोनदा तरी स्टीम घ्यावं.

काही डॉक्टर म्हणतात व्हिडीओ मध्ये लोकं सामूहिकरित्या वाफ घेत आहेत. अशा पद्धतीनं वाफ घेणं अत्यंत चुकीचं आहे. आपण जी दवाखान्यात वाफ घेतो ती स्टराईल वॉटरची वाफ असते. त्यात काही वेळा प्लेन वाफ देतात किंवा काही वेळा काही मेडिसिन टाकलेले असतात. वाफ घेण्याचा मुख्य उद्देश्य फुफ्फुसाच्या नलिका प्रसरण पावून त्यात अडकलेला कफ बाहेर यावा हा असतो. अशा ठिकाणी वाफ घेतल्याने पाण्यात असलेले व्हायरस किंवा बॅक्टेरिया थेट तुमच्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळं दवाखान्यात किंवा घरी चांगल्या पाण्यानं वाफ घेणं हेच चांगलं आहे.


  • वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).