Home हिंदी ‘महा मेट्रो मॅन’ डॉ. दीक्षित यांना ‘कंस्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर’...

‘महा मेट्रो मॅन’ डॉ. दीक्षित यांना ‘कंस्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार

836

नागपूर ब्यूरो : महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या  ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर 2020’ पुरस्कारा करीता निवड झाली आहे. फाउंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग (फर्स्ट) कंस्ट्रक्शन कौन्सिल (बांधकाम व्यवसायाला सर्वतोपरी मदत करणारी संस्था) तर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे.

संबंधित वर्षात या क्षेत्रात अभूतपूर्व काम करत आपल्या कंपनीसह बांधकाम व्यवसायाला पुढे नेणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. 7 सदस्य असलेल्या ज्युरीने डॉ. दीक्षित यांची या पुरस्काराकरीता निवड केली आहे. बेंजामिन ब्रिन, व्यवस्थापकीय संचालक, प्रमुख, एशिया पॅसिफिक बांधकाम विभाग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, विपुल रुंगटा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एचडीएफसी कॅपिटल एडव्हायसर्स, प्रदीप सिंह, माजी उपाध्यक्ष, आयडीएफसी प्रोजेक्ट्स, विजय अग्रवाल, कार्यकारी संचालक, एक्वीरस कॅपिटल, आर. के. नारायण, मुख्य संचालन अधिकारी, ऑल कार्गो लॉजिस्टिक्स पार्क प्रायव्हेट लिमिटेड, मोहम्मद अली जाना, अध्यक्ष, आयएफएडब्लूपीसीए, मालदीव आणि फरीद अहमद, विभागीय प्रमुख, विक्री, अपोलो टायर्स हे ज्युरी सदस्य आहेत.

महा मेट्रो च्या नागपूर आणि पुणे प्रकल्पाचे टीम लीडर म्हणून ब्रिजेश दीक्षित त्यांनी आजवर संपादित केलेल्या यशा करिता त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. नागपुर मेट्रो प्रकल्पा च्या एकूण 4 पैकी 2 मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर, महा मेट्रो नागपूरने केवळ 30 महिन्यात ट्रायल रन घेतले. इतक्या कमी काळात ट्रायल रन घेण्याचा हा एक विक्रम आहे. डॉ. दीक्षित यांच्या नेतृत्वात महा मेट्रोने अनेक पारितोषिके पटकावली आहेत.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleकोविड से हो रही मौतों पर रोक लगाना मुख्य लक्ष्य
Next articleतबलीगियों ने ना तो कोरोना और ना ही धर्म को फैलाया : बॉम्बे हाईकोर्ट
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).