Home Business #Nagpur। जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन नागपुरात 19, 20...

#Nagpur। जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन नागपुरात 19, 20 व 21 जुलै ला

नागपूर ब्युरो : नागपूरकरांसाठी सुवर्णसंधी..! मुंबईचे विख्यात ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्यावतीने एक भव्य दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 19, 20 व 21 जुलै (शनिवार, रविवार आणि सोमवार) दरम्यान हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ, नागपूर येथे सकाळी 10.30 ते संध्याकाळी 8.30 या वेळेत भरवण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात शुद्ध सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने विशेष आकर्षण ठरणार आहेत. विशेष म्हणजे, “Amalia – The Eternal Shine” हा नवा ब्रांड कलेक्शन या प्रदर्शनात पहिल्यांदाच सादर केला जाणार आहे. या कलेक्शनमधील हिऱ्याचे दागिने फक्त ₹4000 पासून उपलब्ध आहेत.

तसेच, “You ‘N’ Me Collection” अंतर्गत 925 सिल्व्हर ज्वेलरी ₹500 पासून उपलब्ध आहे, जे दैनंदिन वापरासाठी आणि गिफ्टिंगसाठी परिपूर्ण ठरेल. पारंपरिक कारागिरीला आधुनिक डिझाईन्सची जोड देत हे प्रदर्शन सर्व वयोगटांतील ग्राहकांना आकर्षित करणार आहे.

दागिन्यांच्या गुणवत्तेचा आणि विश्‍वासार्हतेचा अनुभव घेण्यासाठी नागपूरकरांनी हे प्रदर्शन नक्की बघावे असे आवाहन संचालिका आसावरी पेडणेकर यांनी केले आहे.