Home Nagpur #Nagpur | दिल्लीच्या धर्तीवर नागपुरात मिशन राजपथ

#Nagpur | दिल्लीच्या धर्तीवर नागपुरात मिशन राजपथ

एक वादळ भारताचे या मोहिमे अंतर्गत फुटाळा येथे आयोजन

नागपूर ब्युरो : राष्ट्रीय सणांच्या दिवसांचा उपयोग केवळ सुट्टीसाठी न होता, तो आपल्या राष्ट्रीय सन्मानाचा दिवस व्हावा. मनामनात राष्ट्रभावना वृद्धिंगत व्हावी. या उद्देशाने एक वादळ भारताचे ही चळवळ नागपूरातील तरुण गेल्या आठ वर्षापासून फुटाळा तलाव येथे राबवत आहेत. दिल्लीच्या धर्तीवर नागपुरात देखील मिशन राजपथ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 6 राज्यातील 90 पेक्षा जास्त शहरं आणि 450 हून अधिक ठिकाणी एक साथ राष्ट्रगीत गात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. तरुणांनी तरुणांच्या नेतृत्वात उभारलेल्या एक वादळ भारताचे या मोहिमेत एकत्र येत झेंडावंदन आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे.

राष्ट्रीय सणांच्या दिवसांचा उपयोग केवळ सुट्टीसाठी न होता, तो आपल्या राष्ट्रीय सन्मानाचा दिवस व्हावा. मनामनात राष्ट्रभावना वृद्धिंगत व्हावी. या उद्देशाने एक वादळ भारताचे ही चळवळ नागपूरातील तरुण गेल्या आठ वर्षापासून फुटाळा तलाव येथे राबवत आहेत. दिल्लीच्या धर्तीवर नागपुरात देखील मिशन राजपथ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 6 राज्यातील 90 पेक्षा जास्त शहरं आणि 450 हून अधिक ठिकाणी एक साथ राष्ट्रगीत गात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. तरुणांनी तरुणांच्या नेतृत्वात उभारलेल्या एक वादळ भारताची या मोहिमेत एकत्र येत झेंडावंदन आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे.

नागपुरात मिशन राजपथ

एक वादळ भारताचं या चळवळीच्या माध्यमातून फुटाळा तलाव नागपूर येथे ‘मिशन राजपथ’ संकल्पना साकारण्यात येणार आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राजपथावरील प्रतिकृती फुटाळ तलाव येथे सादर करण्यात येते. यावर्षीसुद्धा स्वातंत्र्य दिनी ‘मिशन राजपथ’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘एक झाड देशासाठी… 52 सेकंद राष्ट्रगीतासाठी…!’ माध्यमातून जागतिक तापमानवाढ विरोधात लढून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा संदेश देण्यात येत आहे.सोशल मीडियाचा आणि लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून 2016 ते 2023 पर्यंत 6 राज्य, 450+ ठिकाण, 90+ शहर सोबत 2000 पेक्षा जास्त लीडर्स कार्यरत आहेत. तसेच 300+ सामाजिक संघटनांसोबत मिळून काम आणि आजपर्यँत 8 वर्षांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचलोय.

कार्यक्रमाचे आगळेवेगळे स्वरुप

या कार्यक्रमाला कोणीही अतिथी नाही, स्टेज नाही, खुर्च्या नाही. येथे सर्व फक्त भारतीय म्हणून एकत्र येण्याचे आवाहन या अभियानाचे मुख्य समन्वयक वैभव शिंदे यांनी केले आहे. अशाप्रकारचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात हिंगणा, कामठी, उमरेड, नागपूर ग्रामीण, सावनेर सहित 50 पेक्षा जास्त ठिकाणी करण्यात आले आहे. नागपूर विदर्भासह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, तेलंगणा व आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील 450 पेक्षा जास्त ठिकाणांवर हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सहभागी होऊन हा राष्ट्रीय सण साजरा करावा, असे आवाहन या चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळी ०८:०० वाजता – ढोलताशांचा गजर (शिवराजे ढोलताशा पथक)
सकाळी ०८:३० वाजता – ११ राष्ट्रीय ध्वजांचे एकसाथ आरोहण (२२ फूट)
सकाळी ०९:०० वाजता – शिवकालीन आखाडा प्रात्यक्षिके (शिवशक्ती आखाडा)
सकाळी ०९:१५ वाजता – भिमाई लेझीम पथक
सकाळी ०९:३० वाजता – राष्ट्रीय ध्वजांचे पथसंचलन
सकाळी ०९:४५ वाजता – स्केटिंग डान्स (सेंट झेवियर्स ग्रुप)
सकाळी १०:०० वाजता – स्काऊट गाईड परेड
सकाळी १०:१५ वाजता – घोडदल पथकाची ध्वजाला सलामी
सकाळी १०:३० वाजता – सामूहिक राष्ट्रगीत गायन
सकाळी १०:३५ वाजता – शपथ सोहळा “मेरा देश, मेरी माटी”
सकाळी १०:४० वाजता – फ्लॅशमॉब
सकाळी १०:५० वाजता – कराटे/तायक्वांडो प्रात्यक्षिके

Previous article#Maharashtra | वयाच्या 37व्या वर्षी 42 हजार कोटींची संपत्ती
Next article#Nagpur | संविधान प्रास्ताविका पार्कचे काम तातडीने पूर्ण करावे, विद्यापीठात संविधान प्रास्ताविका पार्क समितीची बैठक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).