Home Nagpur #Nagpur | संविधान प्रास्ताविका पार्कचे काम तातडीने पूर्ण करावे, विद्यापीठात संविधान प्रास्ताविका...

#Nagpur | संविधान प्रास्ताविका पार्कचे काम तातडीने पूर्ण करावे, विद्यापीठात संविधान प्रास्ताविका पार्क समितीची बैठक

– कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे एनएमआरडीएचे अधिकारी आणि संबंधितांना सूचना

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात निर्माणाधीन असलेल्या संविधान प्रास्ताविका पार्कची कामे तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे एनएमआरडीएचे अधिकारी आणि संबंधितांना दिल्या. संविधान प्रास्ताविका पार्क समितीची बैठक विद्यापीठात सोमवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडली. यावेळी कुलगुरू डॉ. चौधरी बोलत होते. बैठकीमध्ये पार्कच्या प्रगती बाबत आढावा घेण्यात आला.

बैठकीला संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे अध्यक्ष श्री. गिरीश गांधी, माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार प्रकाश गजभिये, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, न्यायमूर्ती श्री. रोही, माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम, नवोपक्रम नवसंशोधन व सहचार्य मंडळ संचालक डॉ. राजेश सिंह, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीश पालीवाल, समितीच्या सदस्य सचिव प्राचार्य डॉ. प्रवीणा बागडे (खोब्रागडे), विद्यापीठ अभियंता पल्लवी गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता चहांदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

संविधान प्रास्ताविका पार्कमध्ये अंतर्भूत असलेली भित्ती चित्रे, शिल्पे तसेच संकल्प चित्रा बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर भित्तीचित्रे, शिल्पे तसेच प्रकल्पाचे संकल्पचित्र निश्चित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारे पार्कचे महाद्वार, सुरक्षा भिंत, अंतर्गत रस्ते आधी विविध कामांचा आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला. पार्कशी संबंधित कामे शासकीय एजन्सी ने लवकरात लवकर पूर्ण करावे याबाबत समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सूचना दिल्या. पार्कच्या विकास कामांबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून समितीला वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना माननीय कुलगुरू डॉ. चौधरी यांनी संबंधितांना दिल्या.

पार्क मधील संबंधित कामे करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सहमती दर्शविल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे व विद्यापीठ अभियंता पल्लवी गिरी यांनी बैठकीत दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने पार्कशी संबंधित विकास कामे शक्यतो लवकरात लवकर तातडीने पूर्ण करावे, असे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले. सोबतच समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह अन्य सदस्यांनी देखील त्यांच्या सूचना बैठकीमध्ये व्यक्त केल्या. बैठकीला विद्यापीठाचे अन्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे एनएमआरडीएचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous article#Nagpur | दिल्लीच्या धर्तीवर नागपुरात मिशन राजपथ
Next article#Maha_Metro | स्वतंत्रता सेनानियों द्वारा विभाजन विभीषिका स्मृति दिवस प्रदर्शनी का उद्घाटन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).