Home मराठी #Maha_Metro | महा कार्डचा सर्वाधिक उपयोग मयंक आणि अरमान यांनी केला

#Maha_Metro | महा कार्डचा सर्वाधिक उपयोग मयंक आणि अरमान यांनी केला

• महा मेट्रो विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार


नागपूर : देशात सर्व स्तरांवर कॅशलेस पेमेंटवर सातत्याने भर दिला जात असताना, नागपूर मेट्रोचे कॉमन मोबिलिटी कार्ड असलेले महा कार्डच्या वापरात ही दिवसेंदिवस वाढ होत आहे. जून २०२३ मध्ये सर्वाधिक वापर करून मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी श्री मयंक काकांनी बीकॉम प्रथम वर्षांचा डॉ. आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी असून श्री. शेख अरमान हा १२ वीचा नारायणा इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे. या दोघांनी सर्वात जास्ती मेट्रो ने जून महिन्यात मेट्रोने प्रवास केला.महा मेट्रो द्वारे सत्कार करण्यात आला.

मुख्य म्हणजे महाकार्डचा वापर वाढवण्यासाठी आणि तिकीट-संबंधित व्यवहारांसाठी रोखीचा वापर टाळण्यासाठी, महा मेट्रोने लकी ड्रॉ प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार दर महिन्याला सोडत काढण्यात येत असून एका महिन्यात जास्तीत जास्त महा कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिल्या जाते

महा मेट्रो नेहमीच प्रवाश्याना कॅशलेस पेमेंटचा उपयोग करण्याकरिता प्रोत्साहित करत असून महाकार्ड व्यतिरिक्त, महा मेट्रो ऍपचा जास्तीत जास्त उपयोग करण्यास प्रोत्साहित करते. क्यूआर (QR) कोड वापरून अँप डाउनलोड केले जाऊ शकते आणि योग्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतर प्रवासी भाडे दिले जाऊ शकते. पेमेंटसाठी महाकार्ड किंवा अॅपचा वापर केवळ डिजिटल पेमेंटला चालना देण्यास उपयुक्त असून याद्वारे रोख व्यवहार ताळता येईल व मेट्रो ट्रेनच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होईल.

महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यात भर घालत आज दिनांक १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत २०० रुपयांचे टॉप अप करत महा कार्ड मोफत मिळवता येईल. २०० रुपयांचे टॉप अप केल्यावर कार्ड खरेदीकरता कुठलीही रक्कम वेगळ्याने देण्याची गरज नाही. सोबत २०० रुपयांचे टॉप अप प्रवास दरम्यान तिकीट खरेदी करता देखील वापरता येते.

महा कार्ड आणि एएफसी प्रणालीमुळे मेट्रोने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त तर झाले आहेच पण या सोबतच कार्डचा वापार केल्याने तिकीट घेण्याची गरज नसल्याने मेट्रो ट्रेन राईड सुखकर देखील केली आहे. आता या सोबत महा कार्ड मोफत मिळणार असल्याने या सोयीचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा हे आवाहन नागपूरमेट्रोने केले आहे.

Previous article#Maha_Metro | स्टूडेंट्स के लिए मेट्रो की लुभावनी योजना, महाकार्ड पर दे रहा 30 फीसदी की छूट
Next articleराज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).