Home Maharashtra Amit Shah । 17 फेब्रुवारीपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री नागपूर, पुणे...

Amit Shah । 17 फेब्रुवारीपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री नागपूर, पुणे आणि कोल्हापूरलाही देणार भेट

417

नागपूर ब्युरो : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १७ फेब्रुवारीपासून ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते नागपूर, पुणे आणि कोल्हापूर शहरांना भेटी देणार आहेत.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री शुक्रवारी रात्रीच्या विमानाने नागपूरला येतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी रात्री १० वाजता नागपुरला येत आहे. रात्री त्यांचा वर्धा रोडवर स्थित रॅडीसन ब्ल्यू येथे मुक्काम आहे. १८ रोजी सकाळी १०.३० वाजता दीक्षाभूमीला भेट देऊन आदरांजली वाहणार आहे. त्या नंतर ११ वाजता रेशिमबाग येथे जाऊन डाॅ. हेडगेवार स्मृतिस्थळ व गुरूजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतील. नंतर एका स्थानिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

खासगी कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुपारी २.३५ वाजता पुण्याला प्रयाण करतील. पुण्यातील कसबापेठ आणि पिंपरी-चिंचवड येथील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह बैठक घेणार आहेत. पुण्यात अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नंतर रात्री जे. डब्ल्यू माॅरियट हाॅटेलमध्ये रात्री मुक्कामाला राहिल. रविवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवसृष्टीचे लोकार्पण आहे. १९ रोजी दुपारी १.३० वाजता ते काेल्हापुरला येणार आहे.

कोल्हापूर येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तसेच १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाह सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोल्हापूर येथे छत्रपती शाहु महाराज आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना अमित शाह मार्च २०१८ मध्ये रेशीमबाग संघ कार्यालयात गेले होते. परंतु, केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर नागपुरातील संघ कार्यालयात ते पहिल्यांदाच भेट देणार आहेत. आगामी १२ ते १४ मार्च दरम्यान हरियाणातील सोनीपत येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपतर्फे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा किंवा बी. एल. संतोष सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु, तत्पूर्वी काही महत्त्वाच्या मुद्यावर अमित शाह संघ श्रेष्ठींशी चर्चा करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान आगामी १८ फेब्रुवारी रोजी अमित शाह सरसंघचालकांना भेटणार का? याबाबत संघ आणि भाजपकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Previous articleकेवीआईसी द्वारा खादी कामगारों की मजदूरी में बढ़ोतरी से कारीगरों में खुशी की लहर
Next articleआत्मनिर्भर | भारत की विदेशों में धूम, इन देशों नें LCA तेजस में दिखाई दिलचस्पी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).