Home Nagpur #nagpur । विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी-20 परिषद आयोजनाबाबत आढावा बैठक

#nagpur । विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी-20 परिषद आयोजनाबाबत आढावा बैठक

340

नागपूर ब्युरो : नागपूर येथे मार्च महिन्यात आयोजित होणाऱ्या जी-20-सी 20 परिषदेच्या आयोजनाबाबत गुरुवार ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., सहायक नागपूरच्या सह पोलिस आयुक्त अश्वती दोर्जे, जी-20 आयोजन समितीचे सौ. शेरपा स्वदेश सिंह, किरण डी . एम., वर्किंग कमेटी सदस्य अजय धवले आदी उपस्थित होते.

21 आणि 22 मार्च 2023 दरम्यान नागपूरात जी-20 परिषदेचे आयोजन होणार आहे. यात 27 देशांतील 60 प्रतिनिधींसह भारतातील जवळपास 140 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या उदघाटनापासून ते समारोपापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत तसेच या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

Previous articleMaha_Metro | मेट्रो रेल मार्ग पर पतंगबाजी से बचने की अपील
Next article#Pune | पेट से निकाली 4 किलो की तिल्ली
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).