Home मराठी #Maha_Metro | मेट्रो कार्निव्हलला नागपूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसाद

#Maha_Metro | मेट्रो कार्निव्हलला नागपूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसाद

364

ख्रिसमसला रायडरशीप 1,66,241 च्या वर पोहोचली

  • कार्निव्हल निमित्त आज मेट्रोत होती कार्यक्रमांची रेलचेल
  • सांता क्लॉजने चालत्या मेट्रोत लहानग्यांशी मारल्या गप्पा

नागपूर ब्यूरो : कार्निव्हल निमित्ताने आज महा मेट्रोने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सर्व कार्यक्रमांना नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज सुमारे संपूर्ण दिवस मेट्रो प्रवासा दरम्यान चांगलीच गर्दी जाणवली. नागपूरकरांच्या अपेक्षित प्रतिसाद बघता महा मेट्रो ने प्रवासी सेवा ३० मिनिटे वाढवत १० च्या ऐवजी शेवटची फेरी रात्री १०.३० वाजता निश्चित केली.

आज संपूर्ण दिवस उफाळलेल्या गर्दी चा आढावा घेतला असता आज दिवसाखेर हा आकडा १.५० लाख च्या सुमारास असण्याची शक्यता आहे (८ वाजे पर्यंत १,४५,४३७ इतकी होती). आज सुटीचा दिवस असल्याने नागपूरकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले होते. सोबतच मेट्रो तर्फे विविध स्टेशन वर देखील कार्यक्रमांची मांदियाळी असल्याने गाडी सोबत स्थानकावरील तिकीट खिडकी आणि अन्य ठिकाणी देखील चांगलीच गर्दी जाणवली.

नाताळाच्या निमित्ताने आज सांता क्लॉज ने मेट्रोने प्रवास करत लहान मुलांशी संवाद साधला. बाळ-गोपाळांशी संवाद साधताना सांता क्लॉज ने त्यांना खाऊ देखील दिला. चालत्या गाडीत सांता क्लॉज शी गप्पा मारताना बच्चे कंपनी देखील चांगलीच रंगली होती. सांता क्लॉज ने मुलांशी आपुलकीने चर्चा करत त्यांची चौकशी केली. या एका अनोख्या अनुभवाने लहान मुले देखील प्रफुल्लित झाली होती.

याच सेलिब्रेशन चा एक भाग म्हणून कालपासूनच सर्व मेट्रो स्टेशनवर ख्रिसमस ट्री लावण्यात आले आहेत. या शिवाय झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन येथील अँफी थियेटर येथे वॉरियर समूहातर्फे गीत-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. संगीताची आवड असणाऱ्या नागपूरकरांनी या कार्यक्रमाला चांगलीच उपस्थिती लावली. आपल्या पसंतीची गाणी गात त्यांनी या कार्यक्रमाचा चांगलाच लाभ घेतला. प्रजापती नगर मेट्रो स्टेशन येथे महा मेट्रोच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

एकीकडे प्रवाश्यांच्या मनोरंजना करता विविध उपक्रम राबवत असताना महा मेट्रोने स्टेशनवर फूड स्टॉल ची देखील व्यवस्था केली होती. या स्टॉल चा लाभ घेत अनेकांनी विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. महा मेट्रो तर्फे येते काही दिवस सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. नागपूरकरांनी मेट्रोने प्रवास करत या सर्व कार्यक्रमांचा लाभ घायला हे आवाहन महा मेट्रो तर्फे केले जात आहे.

Previous article#Nagpur | खादी ग्रामोद्योग भवन के नूतनीकरण का उद्घाटन
Next article#Nagpur | राज्यपाल कोश्यारी से मिले पंकजसिंह दादा ठाकुर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).