Home मराठी #Maha_metro | सर्वंकष प्रयत्नांमुळे महा मेट्रोची प्रवासी संख्या सन्मानजनक: महा मेट्रो व्यवस्थापकीय...

#Maha_metro | सर्वंकष प्रयत्नांमुळे महा मेट्रोची प्रवासी संख्या सन्मानजनक: महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित

367

नागपूर ब्यूरो : नागपूरमध्ये प्रवासी संख्या वाढवण्यासाठी महा मेट्रोने सातत्याने आणि प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मेट्रो संवाद आयोजित करणे, लोकांपर्यंत वाहतुकीचे सुरक्षित साधन म्हणून मेट्रोचा वापर करावा हा संदेश पोहोचवणे या सारखे अनेक महत्वाचे उपक्रम महा मेट्रोने राबवले आहेत. सतत केलेल्या या प्रयत्नांना फळ मिळाले असून आणि आज महा मेट्रोची रायडरशिप सन्मानजनक झाल्याचे प्रतिपादन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी आज केले आहे.

केरळ राज्यातील कोची सध्या सुरु असलेल्या पंधराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया (यूएमआय) राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात बोलत होते. या 3 दिवसीय परिषदेचे उद्घाटन
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते काल झाले, तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केरळचे मुख्यमंत्री श्री पिनरई विजयन ऑनलाइन पद्धतीने यात सहभागी झाले होते.महा मेट्रोने व्यावसायिक प्रतिष्ठानांसह शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खाजगी कार्यालये अशा विविध ठिकाणी २०० हून अधिक मेट्रो संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मेट्रो गाडी हे वाहतुकीचे सुरक्षित साधन आहे, हा संदेश भावी प्रवाशांना या माध्यमाने दिला गेला. अशा कटिबद्ध प्रयत्नांमुळेच महा मेट्रो आज मोठ्या प्रमाणात प्रवासीसंख्या जोडली असून एका सन्मानजनक टप्प्यावर मेट्रोची प्रवासी संख्या पोचल्याचे डॉ दीक्षित म्हणाले.सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्यात ही आकडेवारी वाढणार असून मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल, असेही ते म्हणाले. रायडरशिप सारख्या महत्वाच्या मुद्द्यावर काम करताना, महा मेट्रोने या सोबतच टीओडी (ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) सारख्या इतर पैलूंवर देखिललाक्ष घातले आहे.

Previous articleकोच्चि में तीन – दिवसीय यूएमआई राष्ट्रीय सम्मलन प्रारंभ
Next articleभारत जोडो यात्रा । आज यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश; राहुल गांधी मैदानावर मुक्कामी, दही-धपाटे, भाकरी-पिठल्याचा मेन्यू
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).