Home मराठी #Nagpur | शांतीवन चिंचोली येथे धम्मदीक्षा अनुवत्तन दिन समारोह संपन्न

#Nagpur | शांतीवन चिंचोली येथे धम्मदीक्षा अनुवत्तन दिन समारोह संपन्न

361

नागपूर ब्यूरो: नागपूर पासून जवळच असलेल्या शांतीवन चिंचोली येथे धम्मदिक्षा अनुवत्तन दिन समारोह साजरा करण्यात आला. नागपूरची दीक्षा ज्यांनी घडविली असे धम्मसेनापती वामनराव गोडबोले ज्यामुळे नागपूर देशातील दुसरे सारनाथ झाले आहे. शांतीवन चिंचोली जे धम्मसेनापती यांच्या अथक परिश्रमाने साकारून आज नावलौकिकास आली आहे अश्या या पावन स्थळी हजारो अनुयायी या ठिकाणी उपस्थित होते. परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील 400 पेक्षा जास्त वस्तूंचे स्मृती संग्रहालय सर्वांना प्रेरणादायी वास्तू बघण्यासाठी शांतीवन येथे मोठी गर्दी उसळली होती.

प्रथम सकाळी बुद्ध वंदना घेऊन धम्मदीक्षा अनुवत्तन दिनाची सुरवात करण्यात आली. बुद्ध वंदना भन्ते कौडीन्य व भन्ते नागराज यांचे हस्ते देण्यात आली.
यानंतर धम्मदीक्षा अनुवत्तन दिन समरोहास सुरवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद खोब्रागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत हांडोरे (माजी मंत्री), चंद्रशेखर गोडबोले, प्रकाश सहारे चंद्रमनी लावत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तर संचलन प्रदीप लामसोंगे यांनी केले. आभार प्रा. शशी राऊत यांनी मानले. यानंतर लावा येथील सौ. पाटील आणि संच यांनी भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम सादर केला. या दरम्यान मा. चंद्रकांतजी हांडोरे माजी मंत्री यांचे हस्ते बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले. सदर बोधिवृक्ष बुद्धगया येथील मूळ वृक्षापासून सवर्धित केली होती. तसेच नागपूर येथील ब्लू-बर्ड या व्यवसाय व सामाजिक संस्थे मार्फत सर्व उपस्थित यांना भोजन दान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी प्रवीण पाटील, राहुल भैसारे, धम्मपाल दुपारे, गजानन नितनवरे, यांनी परिश्रम घेतले.

Previous article#Amravati | अमरावतीनजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
Next article‘ये रिश्‍ता क्‍या कहलाता है’ । अभिनेत्रीची वैशाली ठक्करने इंदूरमध्ये घेतली फाशी, मृतदेहाजवळ आढळली सुसाइड नोट
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).