Home Maharashtra #Amravati | अमरावतीनजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

#Amravati | अमरावतीनजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अमरावती ब्युरो : शहरातील रहाटगाव-बडनेरा नवीन बायपासवर हॉटेल गौरी इनपासून ५०० मीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा रविवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ४ ते साडेचार दरम्यान मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा, तसेच शव विच्छेदन करून, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे चार ते पाच वर्षे वय असलेल्या नर बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. अज्ञात आरोपी विरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त आर. डब्ल्यू. खेरडे यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जे. मोहोड व डॉ. एस. आर. ठोसर यांनी शवविच्छेदन केले.