Home Nagpur #Maha_Metro | युरोपियन इंव्हेसमेंट बँकेच्या शिष्ट मंडळाची नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट

#Maha_Metro | युरोपियन इंव्हेसमेंट बँकेच्या शिष्ट मंडळाची नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट

337

दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान विविध विषयांवर केली चर्चा

नागपूर ब्यूरो : युरोपियन इंव्हेसमेंट बँकेच्या (ईआयबी) ३ सदस्यीय शिष्ट मंडळाने महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा दोन दिवस दौरा केला. सदर दौऱ्यात ईआयबीच्या श्रीमती हॅलोइस गॉरनाल, श्री झोलटन डोनाथ आणि श्रीमती ऐंजेलिकी कोप्साछेली या तीन अधिकाऱ्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी चर्चा करत मेट्रो रेल प्रकल्पाची तसेच नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – २ ची देखील सविस्तर माहिती जाणून घेतली. महा मेट्रोच्या वतीने या शिष्टमंडळाना प्रकल्पाचे प्रस्तुतीकरण देण्यात आले. युरोपियन इंव्हेसमेंट बँक ही युरोपीअन युनियनचे सभासद असलेल्या विविध देशांच्या अखत्यारीत आहे. पत पुरवठा करणाऱ्या मोठ्या जागतिक बँकांमध्ये या बँकेची गणना होते.

या शिष्ट मंडळाने खापरी आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. मेट्रो स्टेशन येथील तिकीट काउंटर, डिजिटल तिकीट, पार्किंग परिसर, मल्टी मॉडेल इंटिग्रेशन, फीडर सेवा, अग्निशमन उपकरणे, एअर कंडिशनिंग, चार्जिंग सेंटर, बायो डायजेस्टर, वॉटर रिसायकलिंग प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग संसाधनांची माहिती जाणून घेतली. महा मेट्रोद्वारे मेट्रो स्थानक आणि परिसरात उपलब्ध व्यावसायिक क्षेत्र मालमत्ता विकास इत्यादींची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली.

स्थानकांची आणि एकूणच कामकाजाची पाहणी सोबतच या पथकाने मेट्रो भवनच्या नियंत्रण कक्षाला देखील भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षासंबंधी सविस्तर माहिती या अधिकाऱ्यांना दिली. महा मेट्रोतर्फे करण्यात येत असलेल्या विविध कामांची माहिती ईआयबी चमूला देण्यात आली. यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथूर, संचालक (स्टेटर्जिक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटे, संचालक (वित्त) श्री. हरिंदर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous article#Pune | माईर्स एमआईटी शिक्षा संस्था समूह द्वारा जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज मंदिर निर्माण के लिए १ करोड़ ५० लाख का दान
Next article#Maha_Metro | नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास मिळणार गती, ५९९ कोटी रुपये वाढ
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).