Home हिंदी पीक विम्याची नुकसान भरपाई तोकडी व पद्धत सदोष : खा. कृपाल तुमाने

पीक विम्याची नुकसान भरपाई तोकडी व पद्धत सदोष : खा. कृपाल तुमाने

879

महाराष्ट्र राज्याला पीक विम्यापोटी मिळाले 17 हजार कोटी

नागपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाल्यापासून केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला 17 हजार 279 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्यात होणारे पिकाचे नुकसान व त्यातुलनेत मिळालेली भरपाई कमी असल्याचे मत खा. कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले आहे.

खा. कृपाल तुमाने यांनी संसदेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्या आधारावर व किती नुकसान भरपाई दिली यावर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना प्रश्न विचारला. कृषी मंत्री तोमर यांनी 2016 -17 पासून महाराष्ट्राला अनुक्रमे 2 हजार 317, सन 2017 -18 मध्ये 3 हजार 287, सन 2018 -19 मध्ये 5 हजार 949 व गत 2019 -20 वर्षाच्या खरीप हंगामासाठी 5 हजार 726 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात भौगोलीग परिस्तिथीनुसार बहुविध पिके घेतली जातात, याशिवाय राज्य उष्ण कटिबंधिय व मान्सूनच्या मुख्य मार्गावर असल्याने हवामानाचा अचूक अंदाज लावणे अशक्य आहे. यामुळे पिकांचे होणारे नुकसान मोठे आहे. येथील शेतकरी लहान असल्याने महाराष्ट्रात सर्वधिक पीक विमा काढला जातो. मात्र विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना सात वर्षातील सर्वश्रेष्ठ पाच वर्षाच्या सरासरी पिकांचा आधार घेत असल्याने शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई कमी असल्याचे मत त्यांनी नोंदविले.

केंद्राकडून कमी नुकसान भरपाई हंगामानंतर 2 महिन्यात दिली जात असल्याचा दावा केंद्र सरकार करीत असली तरी राज्य सरकार कडून वेळेत विमा प्रीमिअम व त्यांचा वाटा मिळणे गरजेचे आहे. मात्र ही प्रणाली सदोष असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नसून विमा कंपन्या मालामाल होत आहे, यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे खा.कृपाल तुमाने यांनी सांगितले.

Previous articleआईपीएल के पहले प्रैक्टिस मैच में धोनी-वॉटसन की जोड़ी ने मचाया धमाल
Next articleकोविड-19 : पोस्ट कोविड में केयर नहीं, तो और बीमारियों का है डर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).