Home ganeshotsav Ganeshotsav 2022 | गणपती बाप्पा मोरया ने लाडक्या बाप्पाचे आगमन

Ganeshotsav 2022 | गणपती बाप्पा मोरया ने लाडक्या बाप्पाचे आगमन

416

आत्मनिर्भर खबर डॉट कॉम डेस्क: गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात घरोघरी बुधवारी गणरायाचे आगमन झाले. गणरायाचे आगमन होताच विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी गणेश चतुर्थीच्या अगोदरच बाप्पाच्या तयारीसाठीचे सामान खरेदी करून ठेवले. अनेकांनी मंगळवारी रात्रीच तर काहींनी बुधवारच्या सकाळी च बाप्पा घरी आणला आणि विधीवत प्रतिष्ठापना, पूजा केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी (नागपुरात) श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. ना. गडकरी यांनी गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा केली. याप्रसंगी सौ. कांचन गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सानवी व नंदिनी गडकरी उपस्थित होते. गणेश चतुर्थीनिर्मित्त ना. नितीन गडकरी यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.