Home Maharashtra #INFO । ‘जय जय महाराष्ट्र माझा’चे गीतकार राजा बढे कोण होते? नागपूरशी...

#INFO । ‘जय जय महाराष्ट्र माझा’चे गीतकार राजा बढे कोण होते? नागपूरशी आहे खास नातं

473
राजा बढे

नागपूर ब्युरो : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या दोन चरणांच्या गीताला महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मूळचे नागपूरकर असलेले कविवर्य राजा बढे यांच्या गीताला हा सन्मान मिळाल्याबद्दल समाधानाचे स्वर नागपुरातून उमटत आहेत.

1.41 मिनिट अवधीचे हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 19 फेब्रुवारी 2023 पासून अंगीकारण्यात येणार आहे. शाहीर अमीर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने गायलेले आणि त्यांच्या पहाडी आवाजाने अजरामर केलेले हे गीत राजा बढे यांनी लिहिले असून संगीतकार श्री शिवा श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केले आहे.

राज्यगीत म्हणून मंजुरी

विशेषत: सीमा लढ्यापासून आंदोलकांना,मराठी माणसाला हे गीत स्फूर्ती,प्रेरणा आणि चेतना देणारे ठरले होते. आजही हे गीत नव्या पिढीच्या तरुणाईत देखील त्याचं तोडीने गाजते आहे. नागपूरचे कवी राजा बढे यांचा जन्म नागपुरात 1 फेब्रुवारी 1912 रोजी झाला होता. राज्य सरकारने या गीताला राज्यगीत म्हणून मंजुरी दिली. यामुळे नागपूरकर गीतकार राजा बढे आणि पर्यायाने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Previous articleनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय
Next articleमहाराष्ट्र एमएलसी चुनाव | भाजपा-शिंदे सेना को झटका, महाविकास आघाड़ी ने 5 में से 3 सीटें जीतीं
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).