Home Maharashtra पावसाळी अधिवेशन । दुसऱ्या दिवशी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार नारेबाजी

पावसाळी अधिवेशन । दुसऱ्या दिवशी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार नारेबाजी

436

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधकांत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकारविरोधात नारेबाजी केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनीही उपरोधिकपणे त्यांचे चिमटे काढले. विशेषतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवल्यानतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तेवढ्याच आक्रमकपणे त्यांच्यावर पलटवार केला. यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी व विरोधतांत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारास झालेला विलंब यासह अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यास झालेला विलंब असे विविध प्रश्न विरोधकांकडून पावसाळी अधिवेशनात उपस्थित केली जाण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावरुन विरोधक आक्रमक पवित्र्याच्या भूमिकेत आहेत. काल सरकारच्या विरोधात पाऱ्यावर घेतलेली आक्रमक भुतिका आज अधिक तीव्र होण्याचा शक्यता आहे.

Previous article#Nagpur | अमृत महोत्सवी वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सारेच संकल्पबद्ध होऊ या : देवेंद्र फडणवीस
Next articleबीसीआई मोटर्स नागपुर का टू व्हीलर इलेक्ट्रिकल मैन्युफैक्चरिंग का पहला ब्रांड E- Bharat लॉन्च
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).