Home मराठी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची टाच

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची टाच

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडावर आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची टाच आणली आहे. इकबाल मिरची ही कारवाई करण्यात आली असून, याआधीही या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

वरळी मधील सीजे हाऊसमधील प्रफुल्ल पटेलांचे घर जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या मुंबईतच असून, काही वेळापूर्वी ते वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दिसले होते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीने बेकायदा पद्धतीने वरळीमधील तीन मालमत्तांच्या विक्रीचा व्यवहार केला आणि त्यात काळा पैशांचा व्यवहार करण्यात अनेकांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल्ल पटेल यांच्या शरद पवार यांच्यानंतर अतिशय महत्त्व असते. सध्या ते राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार आहेत. युपीएचे सरकार सत्तेत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विमानोड्डाण मंत्रीही होते.

Previous articleस्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती; 125 आमदार, 17 खासदारांचे क्राॅस व्होटींग
Next articleCBSE 12वीं का रिजल्ट जारी | 92.71% छात्र हुए पास; 10वीं का रिजल्ट भी आज ही आएगा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).