Home मराठी Maharashtra । शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री

Maharashtra । शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री

शनिवारी विधानसभेत सिद्ध करणार बहुमत

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही शपथ दिली. या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शपथविधी सोहळ्यात शिंदे समर्थकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. नवे सरकार शनिवारी विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करणार आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्राच्या सर्व घटकाला न्याय देण्याचे काम करू. सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन काम करेन. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत. या साऱ्यांच्या साथीने विकासाचा गाढा हाकेन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले -‘मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा. शिंदे एक तळागाळातील नेते आहेत. त्यांना राजकीय, विधिमंडळ व प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. ते महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी काम करतील असा मला विश्वास आहे.’

मोदींनी अन्य एका ट्विटद्वारे फडणवीस यांचेही कौतुक केले. ‘फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारल्याबद्दल शुभेच्छा. ते भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणा आहेत. त्यांचा अनुभव व कौशल्य सरकारसाठी एक संपत्ती असेल. महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आणखी मजबूत करतील,’ असे मोदी म्हणाले.

Previous articleMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक
Next articleडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).