Home मराठी संजय राऊतांचा सवाल । पवारांना धमक्या देणं ही भाजपची संस्कृती आहे का?

संजय राऊतांचा सवाल । पवारांना धमक्या देणं ही भाजपची संस्कृती आहे का?

महाराष्ट्रातील अभूतपूर्व राजकीय उलथापालथीदरम्यान क्षणोक्षणी नवनवे अपडेट समोर येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर तसेच भाजपवर टीकेची झोड उठवली. शरद पवारांविषयी नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटचाही त्यांनी समाचार घेतला. आता ही लढाई कायदेशीर झाल्याचेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी ट्वीटरवरूनही भाजपवर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही .रस्त्यात अडवू.अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.”

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या ट्वीटचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, काही लोकं आता शरद पवारांना धमक्या देत आहेत. या लोकांनी आधी बाळासाहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना धमक्या दिलेल्या आहेत, ही ज्याची त्याची संस्कृती आहे, पण ही भाजपची संस्कृती आहे का, असा प्रश्न मी विचारतोय.

शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही, अशी धमकी देणारा जर कोणी महाराष्ट्रात असेल तर त्याचा विचार पंतप्रधान मोदी, अमित शहांना करावा लागेल. या देशात लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, शरद पवारांसारखे नेते ज्यांचा आदर पंतप्रधान मोदी करतात, जगभरात केला जातो. अशा नेत्याविषयी चोरून सत्ता मिळवायची आहे म्हणून धमक्या देणं, त्यांच्या वयाचा, त्यांच्या तपस्येचा तुम्हाला आदर नसेल तर मला असं वाटतं की, मराठी म्हणून घ्यायला ते नालायक आहेत.

Previous articleवर्षा ते मातोश्री जागोजागी जंगी स्वागत, सरकारी बंगला सोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वगृही परतले
Next articleNagpur । महापालिकेची कारवाई:पीओपी मूर्ती विक्री दुकानांना सील करणार, श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून दिवाळीपर्यंत सुरु राहिल कारवाई
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).