Home मराठी Nagpur । महापालिकेची कारवाई:पीओपी मूर्ती विक्री दुकानांना सील करणार, श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून दिवाळीपर्यंत...

Nagpur । महापालिकेची कारवाई:पीओपी मूर्ती विक्री दुकानांना सील करणार, श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून दिवाळीपर्यंत सुरु राहिल कारवाई

न्यायालयीन आदेश व केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2021 पासून पीओपी मूर्ती निर्मिती व विक्रीवर बंदी आहे. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर पीओपी मूर्ती बाजारात विक्रीला येत असल्याची तक्रार आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता मागील वर्षीच्या माहितीच्या आधारावर गणेशोत्सवाच्या आधीच पीओपी मूर्ती निर्माते व विक्रेत्यांची दुकाने व गोडाऊनला सील ठोकण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शिष्टमंडळाला दिले.

पारंपारीक मूर्तीकार संघाचे अध्यक्ष सुरेश पाठक यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने गुरुवारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. श्रीकृष्ण जन्माष्टमी ते दिवाळीपर्यंत कारवाई सतत सुरू राहिल, असेही आयुक्तांनी सांगितले. शहराचे बाहेरुन येणाऱ्या पीओपी मूर्तींवर दंडात्मक व जप्तीची कारवाई करण्यात येईल. म्हणून मूर्तीकारांनी पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तीची निर्मिती करावी व ग्राहकांनी मातीच्याच मूर्तीचे पूजन करावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले.

शहराच्या बाहेरून आयात होणाऱ्या पीओपी मूर्तींवर बंदी लावावी, मूर्ती विक्रीसाठी परवान्याची तिथी एक महिना आधी घोषीत करावी, पीओपी मूर्ती िवक्री दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत सील करण्यात यावी, पारंपरिक मातीची मूर्ती निर्मिती व विक्री करणाऱ्या मूर्तीकाराना परवाना शुल्क माफ करावे, त्यांना मूर्ती विक्रीसाठी मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये निःशुल्क जगा उपलब्ध करून द्यावी, पीओपी मूर्ती बंदीच्या अभियानात मदत व सहकार्य करणाऱ्या मूर्ती तज्ज्ञाला अधिकृत प्रमाणपत्र द्यावे, स्वच्छता अभियानाच्या जाहिरातीं प्रमाणे शहरातील भिंतींवर पेंटींग जाहीरात करून जनजागृती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या सर्व मागण्यांवर सविस्तर सकारात्मक चर्चा करून सहकार्य व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Previous articleसंजय राऊतांचा सवाल । पवारांना धमक्या देणं ही भाजपची संस्कृती आहे का?
Next article#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).