Home Electricity ऊर्जामंत्री डॉ. राऊत । इरई धरणावरील तरंगते सौर ऊर्जा पार्क पर्यटकांचे आकर्षण...

ऊर्जामंत्री डॉ. राऊत । इरई धरणावरील तरंगते सौर ऊर्जा पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरणार

मुंबई ब्युरो : चंद्रपूर येथील इरई धरणावर १०५ मेगावॅटचे तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार असून यासंदर्भात आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५८० कोटी रुपये अपेक्षित असून १५ महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलेले आहे. यातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा करण्यात येते.

या सौर ऊर्जापार्कची निर्मिती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य ठिकाण ठरणार आहे.

या ऊर्जापार्कचे पर्यटकांना अवलोकन करता यावे यासाठी गॅलरी व सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात येणार आहे. चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाघांचा व बिबट्याचा वावर असल्याने कर्मचारी व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश डॉ राऊत यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाला दिलेत.

या बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविम सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे,
महानिर्मितीचे संचालक संचलन चंद्रकांत थोटवे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Previous articleये प्यास है बड़ी…
Next articleAIR MARSHAL VIBHAS PANDE ASSUMES COMMAND OF IAF MAINTENANCE COMMAND
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).