Home मराठी विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, सर्व राज्य व्यापणार

विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, सर्व राज्य व्यापणार

कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील भागात दाखल झाल्यानंतर सोमवारी (१३ जून) सकाळी मान्सूनने सह्याद्री ओलांडून मराठवाड्यासह मध्यवर्ती भागाकडे झेप घेतली आहे. सध्या मान्सून कमकुवत असल्याने बुधवार (१५ जून) पर्यंत राज्यातील सर्वच भागात तो दाखल होण्याचा अंदाज आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी काळे ढग दाटून येत आहेत, परंतु पाऊस कोसळत नसल्याचेही चित्र आहे.

बुधवार (१५ जून) पर्यंत मान्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग व्यापणार आहे. तर मान्सूनची दुसरी बंगालची उपसागरीय शाखाही दोन दिवसांत आंध्र, तेलंगणा ओलांडून ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंडच्या काही भागात पोहोचण्यास अनुकूल स्थिती आहे. दोन्ही शाखा एकत्रित पुढे मिसळून वाटचाल करण्याची शक्यता आहे. सोमवारी (१३ जून) कोकणात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज असल्याने तेथे वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Previous articleऔरंगाबादमध्ये पेट्रोल फक्त 54 रुपये लिटर:खरेदीसाठी पंपावर नागरिकांची तोबा गर्दी
Next articleये प्यास है बड़ी…
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).