Home कोरोना दहशत कोरोनाची । नागपूर विमानतळावर पुन्हा ट्रेसिंग अन् टेस्टिंग करणार, पालकमंत्री नितीन...

दहशत कोरोनाची । नागपूर विमानतळावर पुन्हा ट्रेसिंग अन् टेस्टिंग करणार, पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती

दिल्लीकडून आलेल्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोना वाढण्याची भीती व्यक्त करतानाच खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर विमानतळावर पुन्हा लवकरच ट्रेसिंग आणि टेस्टिंग सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मास्क घालण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज दुपटीने वाढत आहे. तसेच उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेखही चढता आहे. यामुळे आरोग्य विभागाने राज्यभरात सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहे. मास्क घालण्याची सक्ती केलेली नसली, तरी काळजी म्हणून सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

राज्यात सध्या पुणे, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे. नागपुरात कोरोना नियंत्रणात असून स्थिती सामान्य असली तरी खबरदारीचे उपाय करण्यात येईल. झेडपी सीईओ आणि जिल्हाधिकारी सध्या मुंबईत आहेत. ते आले की सर्वांसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले.

Previous article#Maha_Metro | नागपूर मेट्रो तर्फे पर्यावरण दिन साजरा, वृक्षारोपण आणि रोपटे वाटप
Next articleसुप्रिया सुळे । तुरुंगातील नेत्यांच्या मतदानासाठी भुजबळांचे प्रयत्न: भाजपच्या नकारामुळे बिनविरोध परंपरा थांबली
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).