Home मराठी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे । कोराडी प्रकल्पातील दोन संचांवरील स्थगिती उठवा

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे । कोराडी प्रकल्पातील दोन संचांवरील स्थगिती उठवा

राज्यातील विद्युत संकट नियंत्रणात आल्याची घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली खरी; पण अघोषित भारनियमनामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. ते थांबवण्यासाठी कोराडी वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संचांवरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

कोराडी विद्युतनिर्मिती प्रकल्पातील दोन संच नव्याने बांधण्यात येणार होते. पण महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने विदर्भात विद्युत संकट उभे राहिले. ही स्थगिती उठवल्यास वीज संकट दूर होण्यास मदत होईल. राज्यातील महावितरणचे नियोजन गेल्या तीन दिवसांत पूर्णतः गडबडले आहे. रात्री-अपरात्री अघोषित भारनियमन होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक असल्याचे बावनकुळे म्हणाले.

विदर्भातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन फडणवीस सरकारने कोराडी वीजनिर्मिती प्रकल्पातील जुने संच पाडून दोन अत्याधुनिक संच उभारण्याचे आदेश पारित केले होते. ते पूर्णत्वास आले असते तर तब्बल १३०० मेगावॅट विद्युत निर्मिती शक्य होती. महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने वीजनिर्मिती थांबली आहे.

राज्यातील ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील काही संच ३० ते ४० वर्षे जुने आहेत. ते संच आवश्यक तेवढा कोळसा देऊनही विजेची निर्मिती करत नसल्याने ते बदलण्याचा निर्णय फडणवीस सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. परंतु राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठलाही विचार न करता, महत्त्वाच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना स्थगिती देण्याचे धोरण राबवल्याची खंत बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Previous articleराष्ट्रवादीची भाजपला मदत । पटोलेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अडीच वर्षांपासून काँग्रेसला सापत्न वागणूक
Next articleकोरोना । 24 तासांत आढळले 1,805 नवीन रुग्ण, 4 जणांची मृत्यू
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).