Home मराठी राष्ट्रवादीची भाजपला मदत । पटोलेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अडीच वर्षांपासून काँग्रेसला सापत्न वागणूक

राष्ट्रवादीची भाजपला मदत । पटोलेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अडीच वर्षांपासून काँग्रेसला सापत्न वागणूक

गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत आहे. पडद्यामागून भाजपला मदत करण्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला. याबाबतची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली असून थोड्याच दिवसांत याचा निर्णय होईल, असे सूचक वक्तव्यही पटोले यांनी केले.

निधीवाटपाचा प्रश्न असेल वा भिवंडीतील काँग्रेस नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देणे असो, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसला दगा दिला, अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.भाजपला रोखण्यासाठी आम्ही सरकारमध्ये येण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादीने सरकार स्थापनेवेळी सांगितले होते. पण, राष्ट्रवादी भाजपला ताकद देत असून काँग्रेसला अडचणीत आणत आहे. हा आमच्या नेत्या सोनिया गांधींचा अपमान आहे. आम्ही हे सहन करणार नाही. म्हणून पक्षश्रेष्ठींच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या. योग्य वेळी शरद पवारांशीही चर्चा करू. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर विचाराने एकत्र आलो आहोत, असेही पटोले म्हणाले.

Previous articleडॉक्टरांच्या मते देशात मुस्लिमांत सर्वात कमी हायपरटेन्शन, तर शिखांमध्ये सर्वाधिक
Next articleमाजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे । कोराडी प्रकल्पातील दोन संचांवरील स्थगिती उठवा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).