Home मराठी राजीव कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती; 15 मे रोजी पदाचा...

राजीव कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती; 15 मे रोजी पदाचा स्वीकारतील कार्यभार

भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची निवड झाली आहे. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्र यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते 14 मे 2022 रोजी पदमुक्त होणार आहेत. राजीव कुमार हे 15 मे 2022 रोजी आपला कार्यभार सांभाळतील. विधी मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केलं असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केलं आहे.

कोण आहेत राजीव कुमार?
राजीव कुमार यांचा जन्म 19 फेब्रुवारी,1960 रोजी झाला असून ते भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली. आपल्या कार्यकाळामध्ये राजीव कुमार यांनी केंद्राबरोबरच बिहार, झारखंड या गृहराज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये कार्य केले. राजीव कुमार यांनी बी.एससी, एलएलबी, पीजीडीएम आणि सार्वजनिक नीती याविषयामध्ये एम. ए. केले आहे. त्याचबरोबर त्यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मनुष्य बळ विकास, वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रामध्ये कामाचा व्यापक अनुभव आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामामध्ये अधिक पारदर्शकता आणणे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सेवा-सुविधा पोहोचवणे, यामध्ये येणा-या मध्यस्थांना टाळून व्यवस्थेमध्ये धोरणात्मक संशोधन करून परिवर्तन घडवून आणण्याविषयी राजीव कुमार कटिबद्ध आहेत.

Previous articleमहंगाई डायन | खाद्यान्न, इंधन महागल्याने किरकोळ महागाई आठ वर्षांच्या उच्चांकावर, एप्रिलमध्ये 7.79 टक्के
Next article21 मे रोजी होणारी नीट-पीजी 2022 पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).