Home Electricity ”ऊर्जामंत्र्यांना केवळ ‘नाश्ता’ न दिल्यानेच अतिरिक्त लोडशेडिंग!” कॉंग्रेसनेत्याचा घरचा आहेर

”ऊर्जामंत्र्यांना केवळ ‘नाश्ता’ न दिल्यानेच अतिरिक्त लोडशेडिंग!” कॉंग्रेसनेत्याचा घरचा आहेर

महाराष्ट्रासह देशात कोळसाटंचाईचे संकट गडद होऊन वीजनिर्मिवर परिणाम होत असतानाच, राज्य व केंद्र सरकारकडून वेगवेगळी स्थिती मांडली जात आहे. तसेच यावरून आता राजकीय टीका देखील होताना दिसत आहे. अशातच कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर अजब टीका केलीय, ते म्हणाले, उर्जामंत्र्यांना केवळ ‘नाश्ता’ न दिल्यानेच लोणार मध्ये अतिरिक्त लोडशेडिंग करण्यात येत असल्याचे ते म्हणाले, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

लोणार कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक आबेद खान यांना राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अजब टीका करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे लोणार येथे 1 मार्च रोजी विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याला आले होते, त्या वेळी त्यांनी ग्राहक मेळावा आयोजित केला होता, परंतु त्या ग्राहक मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार न केल्याने मेळाव्याला बोटावर मोजण्या इतकेच ग्राहक उपस्थित होते, त्यानंतर ते त्या ठिकाणावरून लोणार येथील वनकुटी येथे अल्पोहर करण्यासाठी गेले, मात्र महावितरण विभागाने त्यांची तिथे कोणतीच व्यवस्था न केल्याने, नितीन राऊत यांनी तेव्हा पासून लोणार विषयी राग मनात ठेउन आता कारण नसतांना अतिरिक्त लोडशेडिंग सुरू केले असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोणार नगररिषदचे नगरसेवक आबेद खान पठाण यांनी केला आहे.

सध्या सर्व समाज बांधवांचे सण उत्सव सुरू आहे, त्या मध्ये मुस्लिम समाजाचे पवित्र असे रमजानचे उपवास सुरू आहे, यामध्ये लहान मुले वयोवृद्ध तसेच समाज बांधव उपवास करतात, परंतु दुपारी अतिशय उष्ण तापमान असतांनाही लोडशेडिंग असल्याने जीव पाणी पाणी करतो, परंतु अनेक वेळा समाज बांधवांनी विनंती करूनही लोडशेडिंग बंद केली नाही, उलट अतिरिक्त लोडशेडिंग सुरू करण्यात आली आहे, या मध्ये रात्री अपरात्री वीज जात आहे, त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोणतेही दुजा भाव न करता लोडशेडिंग बंद करावी असा घरचा आहेर नगरसेवक आबेद खान पठाण यांनी केली आहे .

Previous articleचातगाव येथे मोफत रोग निदान व औषधी वाटप शिबीर, विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 1 मे ला होणार उद्घाटन
Next articleवृत्तपत्राच्या कागदासोबतच शाई-प्लेट आणि वितरणही झाले महाग, तरीही भारतात मात्र स्वस्त
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).