Home मराठी वृत्तपत्राच्या कागदासोबतच शाई-प्लेट आणि वितरणही झाले महाग, तरीही भारतात मात्र स्वस्त

वृत्तपत्राच्या कागदासोबतच शाई-प्लेट आणि वितरणही झाले महाग, तरीही भारतात मात्र स्वस्त

वृत्तपत्रांसमोर कागदाची कमी उपलब्धता आणि वाढत्या दराचे संकट तर आहेच, त्यासोबतच छपाईत वापरली जाणारी शाई, प्लेट आणि वितरणाचे दर या वृत्तपत्राच्या तीन प्रमुख खर्चांतही प्रचंड वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांत सागरी मालवाहतुकीच्या दरातही चौपट वाढ झाली आहे. नैसर्गिक वायू-कोळशाच्या दरात झालेल्या वाढीमुळेही वृत्तपत्रीय कागदाच्या कारखान्यांवर दबाव वाढला आहे.

असे सर्व असले तरी, भारतात आजही वृत्तपत्रांची किंमत जगातील प्रमुख देशांपेक्षा अत्यंत कमी आहे. अमेरिकेत वृत्तपत्राचे मासिक देयक जवळपास ७,८०० रुपये आहे, तर भारतात आजही वृत्तपत्राची सरासरी किंमत दरमहा जवळपास १५० ते २५० रुपये एवढीच आहे.

ब्रिटन 2640 ते 6700 रु. दरम्यान महिन्याचे वृत्तपत्र
ऑस्ट्रेलिया 3350 ते 4500 रु. दरम्यान महिन्याचे वृत्तपत्र
पाकिस्तान 300 ते 350 रु. दरम्यान महिन्याचे वृत्तपत्र
तर अमेरिकेत 7806 रुपये दरमहा मध्ये मिळतो द न्यूयॉर्क टाइम्स

-शाई15% पर्यंत महाग झाली रसायनांच्या दरांत झालेल्या वाढीमुळे.
-प्लेट22% पर्यंत महाग झाली धातू विशेषत: अॅल्युमिनियमचे दर वाढल्यामुळे.
त्यासोबतच वृत्तपत्राचे वितरण सतत महाग झाले आहे. गेल्या एक वर्षातच डिझेलच्या दरांत 19.74% ची वाढ झाली आहे. त्यामुळे वितरणाचा खर्चही वाढला आहे.

विशेष म्हणजे आयात होणाऱ्या वृत्तपत्र कागदाचे दर १६ महिन्यांत १७५% पर्यंत वाढले आहेत. भारतीय कागदही ११०% पर्यंत महाग झाला आहे. वृत्तपत्राच्या खर्चात ५० ते ५५% मूल्य कागदाचे असते, तर छपाईत वापरली जाणारी शाई-प्लेट आणि वितरणामुळे खर्चात १० ते १५% आणखी वाढ होते. दुसरीकडे, कोविडमध्ये वृत्तपत्रांच्या जाहिरातींमुळे होणारे उत्पन्नही
कमी झाले आहे.

Previous article”ऊर्जामंत्र्यांना केवळ ‘नाश्ता’ न दिल्यानेच अतिरिक्त लोडशेडिंग!” कॉंग्रेसनेत्याचा घरचा आहेर
Next articleIIM NAGPUR । ‘डिजिटल’ जगाच्‍या आव्‍हानांसाठी तयार रहा – एस. एन. सुब्रमण्‍यम
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).