Home मराठी चातगाव येथे मोफत रोग निदान व औषधी वाटप शिबीर, विजय वडेट्टीवार यांच्या...

चातगाव येथे मोफत रोग निदान व औषधी वाटप शिबीर, विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 1 मे ला होणार उद्घाटन

डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज स्टुडंट्स असोसिएशन चातगाव यांचे आयोजन

गडचिरोली ब्यूरो : डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज स्टुडंट्स असोसिएशन चातगाव, तालुका धानोरा तर्फे टॅलेंट कॉन्टेस्ट (नृत्य स्पर्धा), वनौषधी लागवड संवर्धन प्रक्रिया, बाजारपेठ यावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 1 मे रोजी दुपारी 12 वाजता साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव येथे मोफत रोग निदान व औषधी वाटप शिबिराचे उद्घाटन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला वाव देखील मिळणार आहे. उद्घाटन सोहळा रविवार 1 मे रोजी दुपारी 12 वाजता होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष एड. राम भाऊ मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य राहतील. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक मिलेश शर्मा, उपपोलीस अधीक्षक प्रवीण डांगे, जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, पत्रकार अविनाश भांडेकर, पत्रकार मिलिंद उमरे, प्रसिद्ध अधिवक्ता एड. चंद्रराज पांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पडवे, डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव चे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघ गडचिरोली चे राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान, डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चे कोषाध्यक्ष डॉ. अमित रामने, सरपंच गोपाल उईके, माजी सरपंच नारायण सय्याम आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

या कार्यक्रमाअंतर्गत 2 मे रोजी दुपारी 3 वाजता बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण अधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम राहतील. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पत्रकार अविनाश भांडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पडवे, डॉ. प्रमोद साळवे, डॉ. अमित रामने प्रामुख्याने उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य दीप्ती भादुरी, उपप्राचार्य स्वागता खोबरागडे, अध्यक्ष निकिता सडमेक, उपाध्यक्ष वनश्री दाजगाये, उपाध्यक्ष शीतल पदा, सचिव प्रणाली तुलावी आदिने केले आहे.

Previous articleसमृद्धी महामार्गाचे उद्घाटन महिनाभर पुढे ढकलले, तज्ज्ञ समितीचा दौरा न झाल्याचे कारण
Next article”ऊर्जामंत्र्यांना केवळ ‘नाश्ता’ न दिल्यानेच अतिरिक्त लोडशेडिंग!” कॉंग्रेसनेत्याचा घरचा आहेर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).