Home मराठी महंगाई डायन खाए जात है | मार्च महिन्यात ठोक महागाई दर 14.55%;...

महंगाई डायन खाए जात है | मार्च महिन्यात ठोक महागाई दर 14.55%; 4 महिन्यांचा उच्चांक

देशात महागाईने घेतलेला सुसाट वेग थांबायला तयार नाही. मार्चमध्ये ठोक महागाई दर १४.५५% नोंदला आहे. हा गेल्या चार महिन्यांत सर्वात जास्त आहे. याचे मुख्य कारण तेल, विविध जिनसांच्या घाऊक किमतीतील तेजी आहे. सरकारने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाई दर १० टक्क्यांवर राहिलेला मार्च सलग १२ वा महिना राहिला आहे. याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये ही १४.८७% च्या उच्च पातळीवर हाेती.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा १३.११% आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये ७.८९% होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार, घाऊक महागाई दरातील वाढ प्रामुख्याने कच्चे तेल, नैसर्गिक वायू, खनिज तेल, धातू आदींच्या किमतीतील वाढीमुळे झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने महागाई वाढली. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले, घाऊक महागाई वाढण्याचा परिणाम हळूहळू किरकोळ किमतींवरही होतो. मात्र, रिझर्व्ह बँक पतधोरणाशी संबंधित निर्णय घेताना किरकोळ महागाई दराच्या आकड्यांकडे लक्ष दिले जाते.

एका वर्षात इंधन ५०% आणि वीज २०% महाग

  1. पेट्रोल        53.44%
  2. डिझेल       52.22%
  3. वीज          21.78%
  4. भाजीपाला   19.88%
  5. मोहरी तेल   24.16%
  6. सोया तेल    19.21%

किरकोळ महागाई दर विक्रमी पातळीवर असताना घाऊक महागाईचा आकडा आला. मार्चमध्ये किरकोळ महागाई ६.९५% नोंदली. ही १७ महिन्यांत सर्वाधिक आहे. आरबीआयने महागाईची दखल घेतली आहे. बँकेने पतधोरण आढाव्यात वित्त वर्ष २०२२-२३ साठी याचा अंदाज ४.५% वरून वाढून ५.७% केला आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने एमसीएलआरमध्ये १० बेसिस पाॅइंटची वाढ केली आहे. वाढलेले दर १५ एप्रिलपासून लागू झाले. यामुळे एसबीआयकडून गृह, वाहन आणि पर्सनल लोन महाग झाले. यासोबत हप्ताही वाढेल. एसबीआयने १ दिवसापासून ३ महिन्यांपर्यंत एलसीएलआर ६.६५% वरून वाढून ७.०५% केले आहे.१ वर्षासाठी ७.१० असेल. २ व ३ वर्षंासाठी हे ७.३०% ऐवजी ७.४०% असेल. गेल्या आठवड्यात बँक ऑफ बडोदाने एमसीएलआरमध्ये ०.०५% वाढ केली. हे १२ एप्रिल २०२२ पासून लागू झाले. आरबीआयने एप्रिल २०१६ पासून बँकांचे कर्ज दर निश्चित करण्यासाठी बेस रेटऐवजी एमसीएलआर व्यवस्था लागू केली होती.