Home Maharashtra मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा । 2 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा । 2 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटणार, 739 दिवसानंतर दिलासा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमध्ये जखडलेल्या जनतेला गुढीपाडव्यापासून पुन्हा मनमोकळे जगता येणार आहे. २ एप्रिल रोजी मराठी नववर्षापासून मास्क सक्तीसह कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. यामुळे गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती यंदा नेहमीच्या जल्लोषात साजरी करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोनाकाळात लावण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. यापुढे मास्क लावणे बंधनकारक नसून ऐच्छिक करण्यात आले आहे.

कोरोना महामारीनंतर देशात २४ मार्च रोजी पहिले लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. तरीही विवाह सोहळे, धार्मिक सोहळे, मिरवणुका, शोभायात्रा, सार्वजनिक कार्यक्रमांवरील मर्यादित उपस्थितीचे निर्बंध कायम होते. हॉटेल्स, सिनेमा, नाट्यगृहांमध्येही के‌वळ ५० टक्के क्षमतेएवढीच सवलत देण्यात आली होती. परंतु मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण, घटती रुग्णसंख्या पाहता निर्बंध हटवण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष लागून होेते. पहिल्या लॉकडाऊननंंतर ७३९ दिवसांनी २ एप्रिल रोजी निर्बंध हटणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

देशात २४ मार्च २०२० रोजी लावला होता पहिला लॉकडऊन सार्वजनिक ठिकाणे, बगिचे, मॉल, उद्याने, सार्वजनिक वाहतूक, प्रवासासाठी लस प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही राज्यात गुरूवारी १८३ नवे कोरोना रुग्ण, २१९ बरे राज्यात गुरूवारी २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १८३ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र बुधवारच्या तुलनेत रुग्ण संख्या ६४ ने वाढली. गेल्या २४ तासांत एका मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यात ९०२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुण्यात आढळला होता त्यानंतर आजतागायत ७८ लाख ७४ हजार २४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

गुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व िनर्बंध हटवण्यात येणार आहेत. मास्क सक्तीचा निर्णयही मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बस प्रवास, हॉटेल्स, सिनेमा-नाट्यगृहांमधील ५० टक्के प्रवेशाची मर्यादाही हटवण्यात येणार असून सार्वजनिक वाहतूक तसेच प्रवासावेळी लसीच्या दोन मात्रांचे प्रमाणपत्र दाखवण्याची सक्तीही मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली.

मास्कमुक्तीसह विवाह सोहळे, हाॅटेल्स, सिनेमागृहातील उपस्थितीची मर्यादा हटवली गुढीपाडवा, रामनवमी, डॉ.आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान यंदा जल्लाेषात मास्क सक्ती नाही, मात्र मास्क लावणे ऐच्छिक असेल हॉटेल, रेस्तराँ, जिम, सिनेमा-नाट्यगृहे, शैक्षणिक संस्थामधील उपस्थितीवर मर्यादा नाही

विवाह सोहळे, धार्मिक, कौटुंबिक, सार्वजनिक कार्यक्रम, अंत्ययात्रांमधील उपस्थितीची मर्यादा हटवणार बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लसीचे प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. सार्वजनिक ठिकाणे, मॉल, बगीचे,उद्याने या ठिकाणी मास्क वापरणे किंवा लस प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त, यात्रा-जत्रा धूमधडाक्यात होणार. निर्बंध हटवण्यात आले तरीही कोरोना नियम पाळण्याचे आवाहन

Previous articleApril Fool | फ्रांस में 440 साल पहले हुई थी अप्रैल फूल बनाने की शुरुआत
Next article#Nagpur | केवीआईसी के विपणन विशेषज्ञ सदस्य मनोज कुमार गोयल ने किया विदर्भ का दौरा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).