Home Maharashtra Nagpur । प्राजक्ता लवंगारे-वर्मा केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव पदी नियुक्त

Nagpur । प्राजक्ता लवंगारे-वर्मा केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव पदी नियुक्त

नागपुरच्या विभागीय आयुक्त पदावर केले उल्लेखनीय कार्य

नागपूर ब्यूरो : नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यासंदभार्तील आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले.

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची 22 जून 2021 रोजी नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी त्या मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. प्राजक्ता लवंगारे-वर्मा या अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. विभागीय आयुक्तपदाच्या अतिशय कमी कालावधीतही त्यांनी आपली विशेष अशी छाप सोडली आहे.

कोरोना काळात विभागाचे सक्षमपणे निभावले नेतृत्व

प्राजक्ता लवंगारे-वर्मा विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा नागपुरातच नव्हे, तर विभागातच कोरोनाचे संक्रमण होते. कोरोना काळात त्यांनी विभागाचे सक्षमपणे नेतृत्व केले. बंद असलेले आॅक्सिजन प्लांट सुरू केले. सिरो सर्व्हे केला. शासकीय शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विभागीय स्तरावर होणारी महसूल बैठक त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यावर भर दिला. प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून तेथील रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

सात-बारा घरपोच देण्यासाठी विशेष अभियान

शेतकऱ्यांना सात-बारा घरपोच मिळावा यासाठी त्यांनी विशेष अभियान राबविले. तब्बल 25 लाख शेतकऱ्यांना मोफत घरपोच सातबारा उपलब्ध करून देण्यात आला. इतकेच नव्हे, नागपुरातील शांतिवन चिचोली येथील प्रकल्प जवळपास पूर्ण होत आल्यानंतर थोड्याशा निधीमुळे प्रकल्प रखडला होता. प्राजक्ता लवंगारे यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने निधी मंजूर केला. गाव-वस्त्यांना असलेली जातिवाचक नावे हटवून त्याठिकाणी महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याच्या अंमलबजावणीसाठी प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी विशेष पुढाकार घेतला.

Previous article#Nagpur | ग्रीन विजिल ने मनाया विश्व जल दिवस
Next articleतेल कंपनियों ने कीमतों में 80 पैसे की बढ़ोतरी की, चार दिन में 2 रुपए 40 पैसे बढ़े दाम
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).