Home मराठी राहुल गांधीं । लवकरात लवकर आपल्या पेट्रोलच्या टाक्या भरून ठेवा, मोदी सरकारची...

राहुल गांधीं । लवकरात लवकर आपल्या पेट्रोलच्या टाक्या भरून ठेवा, मोदी सरकारची ‘इलेक्शन’ ऑफर संपत आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विट केले- लवकरात लवकर आपल्या पेट्रोलच्या टाक्या भरून ठेवा. मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे. भाजप सरकार निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबवते आणि निवडणुका संपल्या की लगेचच दर वाढवल्याचा आरोप काँग्रेस नेते करत आहेत.

भाजपचे लोक धर्म आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मते मागत आहेत. भाजप संपूर्ण देशात हिंदू धर्मावर बोलत आहेत. हिंदू धर्माचा खरा अर्थ सत्य असा आहे. परंतु, भाजप लोक खोट्या गोष्टींच्या आधारे मते मागत आहेत. पंतप्रधान मोदी हे खोट्या गोष्टींचे संरक्षण करत आहेत. भाजपमधील लोक आपापली खूर्ची वाचवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अनेक दिवसांपासून भाजप सरकार निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ थांबवते आणि निवडणुका संपल्या की लगेचच दर वाढवतात असा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा सध्याचा टप्पा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 7 मार्चला संपणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Previous articleरशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा, भारतीयांच्या सुटकेच्या प्रयत्नांना येणार वेग
Next articleयुक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा:भारतात करु शकतील इंटर्नशिप
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).