Home मराठी रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा, भारतीयांच्या सुटकेच्या प्रयत्नांना येणार वेग

रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा, भारतीयांच्या सुटकेच्या प्रयत्नांना येणार वेग

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनमध्ये युद्धविराम जाहीर केला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता युद्धविराम झाला आहे. जोपर्यंत तेथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत हल्ले होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. युक्रेनमध्ये गेल्या १० दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे.

दरम्यान, रशियाने आता युद्धविरामाची भाषा केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. तर तिसऱ्या फेरीची चर्चा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे युक्रेनमध्ये अजूनही अनेक लोक अडकले आहेत. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत त्या सर्वांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

24 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या दोन्ही देशांमधील युद्धाच्या दरम्यान 5 मार्च म्हणजेच शनिवारी ही दिलासादायक बातमी आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारी युद्धविराम जाहीर होण्यापूर्वी कीव्हजवळील बुका येथे रशियन सैन्याने सर्वसामान्यांवर गोळीबार केला. बुका येथे रशियन सैनिकांनी एका कारवरही गोळीबार केल्याचा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केला आहे. यात 17 वर्षीय मुलीसह दोघांचा मृत्यू झाला. तर 4 जण जखमी झाले आहेत. एवढेच नाही, तर राजधानी कीव्हच्या बाहेर इरपिन शहरातील लष्करी रुग्णालयावरही रशियन लष्कराने शनिवारी बॉम्बहल्ला केला आहे. रशियन सैन्याने सकाळपासून इरपिन शहरात गोळीबार सुरू केला आहे. सकाळपासून येथे हवाई हल्ल्याचे सायरनही वाजत आहेत.

युद्धविरामाच्या अंतर्गत युक्रेनच्या वोल्नोवाखा या डीपीआर शहरात एक मानवी कॉरिडॉर तयार केला जाईल. याद्वारे अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जाईल. या ठिकाणी युक्रेनचे सैन्यही तैनात होते. युक्रेनला या युद्धबंदीमुळे तात्पुरता दिलासा मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये युद्धविराम घोषित केला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच जोपर्यंत येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात नाही तोपर्यंत हल्ले होणार नाहीत. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता युद्धविराम करण्यात आला. यापूर्वी युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, रशिया सतत लष्करी तळांवर तसेच नागरी भागांवर हल्ले करत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपीय नेत्यांना रशियाला रोखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. झेलेन्स्की म्हणाले, ‘जर रशियाला रोखले नाही, तर संपूर्ण युरोप नष्ट होईल.’

Previous article‘ऑपरेशन गंगा’ के पहले विदेशी जमीन पर ये बड़े रेस्क्यू मिशन चला चुका है भारत
Next articleराहुल गांधीं । लवकरात लवकर आपल्या पेट्रोलच्या टाक्या भरून ठेवा, मोदी सरकारची ‘इलेक्शन’ ऑफर संपत आहे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).