Home मराठी समीर वानखेडेंविरोधात ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा, वयाची चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याचा...

समीर वानखेडेंविरोधात ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा, वयाची चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याचा आरोप

456

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याच्या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 2 फेब्रुवारी रोजी समीर वानखेडे यांच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी तक्रार दाखल केली होती. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्यानंतर कोपरी पोलिस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोगावले यांनी शनिवारी रात्री 8 वाजेयच्या सुमारास कोपरी पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती दिली आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्य विक्रीचा परवाना मिळवला अशी माहिती गोगावले यांनी तक्रारीत दिली आहे.

Previous articleCovid- 19 | नागपूर जिल्ह्याला कोरोना निर्बंधातून मिळणार शिथिलता
Next articleसंजय राऊत । तुम्ही केंद्रात मंत्री असाल, पण हे विसरू नका की आम्ही तुमचे बाप आहोत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).