Home कोरोना Covid- 19 | नागपूर जिल्ह्याला कोरोना निर्बंधातून मिळणार शिथिलता

Covid- 19 | नागपूर जिल्ह्याला कोरोना निर्बंधातून मिळणार शिथिलता

526

नागपूर ब्युरो : शासनाने राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्याकरिता शासन आदेशान्वये नवीन निर्बंध लावले होते. मात्र नागपूर जिल्ह्यात लसीकरणात पहिल्या डोस चे प्रमाण 99.5% तर दुसऱ्या डोस चे प्रमाण 71.55% झाले असून नागपूर जिल्हा शासन आदेशातील तिसऱ्या क्रमांकाच्या शिथिलते करिता पात्र झालेला आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर तीन पेक्षा कमी असून एकंदर कोरोना आजाराची परिस्थिती जिल्ह्यात नियंत्रणात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे शासनास सादर करण्यात आलेल्या निबंधातून शिथिलता मिळण्याच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्याला शिथिलता लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

या आदेशानंतर नागपूरच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष आर. विमला यांनी शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी एक आदेश निर्गमित केले आहे या आदेशान्वये नागपूर जिल्ह्यात पुढील शिथिलता देण्यात येणार आहे…

  1. राष्ट्रीय उद्यान, सरकारी बाग-बगीचे, प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळ, अम्युजमेंट पार्क, थीम पार्क, स्विमिंग पूल, किल्ले व इतर मनोरंजन स्थळांना नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने चालविण्याची मुभा आता मिळाली आहे.

  2. ब्युटी पार्लर, सलून, हेअर कटिंग सलून, वेलनेस सेंटर आणि जिम यांना नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा नवीन आदेशान्वये मिळालेली आहे.

  3. रेस्टॉरंट, हॉटेल, उपहारगृहे इत्यादींना नियमित वेळेनुसार 50% क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा मिळालेली आहे, याच बरोबर नागपूर जिल्ह्यातील सिनेमागृह, नाट्यगृह यांनासुद्धा 50 टक्के क्षमतेने चालविण्याची मुभा देण्यात आली आहे.

  4. याव्यतिरिक्त सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आदी कार्यक्रमांना नियमित वेळेनुसार 25 टक्के क्षमतेने किंवा दोनशे व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल तदनुसार कार्यक्रम करण्याची मुभा असणार आहे.

  5. लग्न समारंभ, सोहळे इत्यादींकरिता सुद्धा नियमित वेळेनुसार 25 टक्के क्षमतेने किंवा दोनशे व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल तदनुसार कार्यक्रम आयोजित करण्याची मुभा दिली गेली आहे.

  6. अंतिम संस्कार नियमितपणे करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

  7. क्रीडा कार्यक्रमा करिता नवीन नियमांमध्ये 50 टक्के क्षमतेने किंवा 200 व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल तदनुसार कार्यक्रमाची अनुमति प्रशासनाने दिली आहे.

  8. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशात नागपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे सर्व आठवडी बाजार नियमित करण्यात येणार असल्या जी बाब प्रकर्षाने लिहिण्यात आलेली आहे.

मुख्य म्हणजे नागपूर जिल्ह्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या परिपत्रकानुसार सुरू करण्यात आलेल्या शाळा आणि कॉलेज यांनासुद्धा नियमित सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांचे पालन न करणारी किंवा उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व तदनुसार कारवाईसुद्धा करण्यात येईल. सदर आदेश नागपूर जिल्हा क्षेत्राकरीता लागू असून नागपूर शहराकरिता नागपूरचे मनपा आयुक्त स्वतंत्र आदेश काढणार आहेत.

Previous articleना स्वागत, ना भाषण.. फक्त शिवजागर, क्रांती चौकात 25 हजार शिवप्रेमींचा जल्लोष
Next articleसमीर वानखेडेंविरोधात ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा, वयाची चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याचा आरोप
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).