Home हिंदी संवाद : नागपूर उत्पादन आणि निर्यातीचे मोठे केंद्र व्हावे : नितीन गडकरी

संवाद : नागपूर उत्पादन आणि निर्यातीचे मोठे केंद्र व्हावे : नितीन गडकरी

750

नागपूर : नागपूर हे विविध उत्पादनांचे आणि निर्यातीचे मोठे केंद्र व्हावे आणि येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळून शहराचे चित्रच बदलून जाईल. यासाठी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वात सर्व उद्योजक व व्यापार्‍यांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांशी ना. गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. ते पुढे म्हणाले- अत्यंत कठीण स्थितीत उद्योजक आणि व्यापार्‍यांनी आपल्या व्यापार टिकवला आहे. उद्योजक व व्यापार्‍यांना एमएसएमईचे लाभ मिळावेत अशी आपली मागणी लक्षात घेता सर्व व्यापार्‍यांना या सेवा मिळाव्यात, याबद्दल मी सकारात्मक आहे. विविध उद्योजक आणि व्यापार्‍यांना एमएसएमईत आणण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी गडकरी यांनी व्यापार्‍यांशी संवाद साधताना काही सूचना केल्या. त्यात नागपूर शहराबाहेर रिंगरोडवर सर्व व्यापारी आणि उद्योजकांसाठी गोडावून बनवावे. यासाठी चेंबरने पुढाकार घ्यावा त्यामुळे व्यापार्‍यांचा वाहतुकीवर होणारा खर्च कमी होईल. तसेच शहराच्या चारही दिशांना ट्रक ट्रान्सपोर्ट टर्मिनलची आवश्यकता आहे. यासाठी जागा उपलब्ध करता येईल. या ठिकाणी गोडावून, कार्यालये, हॉटेल रेस्टाँरंट, बँका सुरु करत येतील. यासाठीही चेंबरने पुढाकार घ्यावा. शासकीय स्तरावर लागणारी मदत मी करीन. विविध व्यापारी उद्योजकांसाठी गोडावून बनतील ट्रान्सपोर्ट शहराबाहेर जाईल आणि प्रदूषणही कमी होईल. तसेच होलसेल किराणा व्यापार्‍यांसाठी कळमन्यात जागा आहे. तेथे बहुमजली मार्केट उभे करता येईल. पार्किंगपासून सर्व व्यवस्था तेथे करता येतील. इतवारीत दाटीवाटी आहे. पार्किंग नाही, उभे राहायला जागा नाही अशा स्थितीत लोक येणार नाहीत. एकाच ठिकाणी सर्व वाणिज्य सेवा हलविली जाऊ शकते, अशा सूचना ना. गडकरी यांनी केल्या.

सुमारे 25 वर्षानंतरचे नागपूर व्यापारी उद्योगाच्या दृष्टीने कसे असेल याचे डिझाईत तयार व्हावे. नागपूर हे उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र झाले तर अर्थव्यवस्थेला गतीने चालना मिळेल, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- मोठे प्रदर्शनीचे केंद्र नागपूर व्हावे. रेाजगार मिळेल, पर्यटकांची संख्या वाढेल. तेलंखेडी येथे जगातील मोठे फाऊंटेन आपण तयार करीत आहोत. त्यामुळे व्यापार वाढेल. 5 हजार कंटेनर निर्यात होतील तर नागपूरची अर्थव्यवस्थाच बदलून जाईल. विविध उद्योगांचे समूह तयार करा, मी मदत करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

अजनीला मल्टीमॉडल हब
अजनी रेल्वे स्टेशन हे मल्टीमॉडल हब बनविले जात असल्याचे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, यासाठी 900 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. अमेरिकेच्या आर्किटेक्ट ने हे डिझाईन बनवले आहे. एकाच ठिकाणाहून अनेक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच बडनेरा गोंदिया, गोंदिया चंद्रपूर, रामटेक नरखेड, नरखेड वडसा, बडनेरा छिंदवाडा ही ब्रॉडगेज मेट्रो सुरु होणार आहे. या मुळे नागपूरचे महत्त्व वाढणार आहे, यासाठी माझे व्यक्तिगत प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.

गरिबांच्या पाठीशी उभे राहा : गडकरी
कोरोनाचा अत्यंत कठीण काळ आहे. कोरोनाला सहजनेते घेऊ नका. या काळात चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी गरिबांच्या पाठीशी मदतीसाठी उभे राहा.त्यांची सेवा करा, त्यांना मदत करा अशी कळकळीची प्रार्थना ना. गडकरी यांनी यावेळी केली. अनेक संकटांवर आपण मात केली आहे. त्याप्रमाणे या संकटावरही मात करू, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी आर्थिक संकटाचाही सामना करून त्यावरही मात करू असा आत्मविश्वास बाळगा आणि समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करा असेही ते म्हणाले.

Previous articleपीएम मोदी ने शिक्षा पर आयोजित सम्मेलन में बताया आखिर क्या हैं 21वीं सदी के स्किल?
Next articleLokmat’s Devendra Darda now Chairman of Audit Bureau of Circulations
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).