Home मराठी Salary hike | पगारवाढीला अच्छे दिन! महामारीचा परिणाम ओसरला?

Salary hike | पगारवाढीला अच्छे दिन! महामारीचा परिणाम ओसरला?

508

काही क्षेत्रातील चाकरमान्यांना पगारवाढीचा (Increment) सुखद धक्का मिळणार आहे. या क्षेत्रात 10 टक्क्यांपर्यंत पगारवाढ करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून झालेली कोंडी एकदाची फुटली आहे. हमी भी है जोश में म्हणत कंपन्यांनी कर्मचा-यांना पगार वाढीचा मंत्र दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने अनेकांची विकेट पाडली. कित्येकांच्या नोक-या हिरावल्या. काहींचे राजीनामे बळजबरीने लिहून घेण्यात आले. पण कोरोनामय जग सारे म्हणत सगळ्यांनी कोरोनाचा धसका सोडून त्याच्यासोबत जगण्याचा निर्णय घेतला आणि स्थिती पालटायला लागली. आता तर काही क्षेत्रात भरघोस पगारवाढीचे सत्र सुरु झाले आहे. मोठ्या प्रमाणात कामगार, कर्मचारी, अधिकारी कपात केल्यानंतर कंपन्यांना आहे तो स्टाफ टिकवणे गरजेचे झाले आहे. कुशल मनुष्यबळ टिकवण्यासाठी कर्मचा-यांना पगारवाढ केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

बहुतांश कंपन्या यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्याची योजना तयार करत आहेत. एका अहवालानुसार, काही कंपन्यांनी आतापर्यंत थांबलेली पगारवाढीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनापूर्व काळापासून काही जणांना पगारवाढ नाकारण्यात आली होती. कपातीसह आहे त्या पगारात काम करण्याची वेळ कर्मचा-यांवर आली होती. आता त्याची भरपाई देण्याची योजना कंपन्या तयार करत आहे. कर्मचा-यांना कोरोना पूर्व काळापासून पगारवाढ देण्याचा विचार आहे. यंदा सरासरी 9.4 टक्के दराने कंपन्या पगारवाढ देऊ शकतात, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 2021 मध्ये कंपन्यांनी सरासरी 8.4 टक्के वाढ दिली. त्याचबरोबर कोविड महामारी येण्यापूर्वी 2019 मध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 9.25 टक्के वेतनवाढ दिली होती.

यंदा कोविड-19 चा अर्थचक्रावर फार मोठा परिणाम दिसून येणार नसल्याचे कंपन्या, व्यापारी आणि न्यावसायिकांचे मत असल्याचा दावा कोर्न फेरी इंडियाच्या (Korn Ferry India) वार्षिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे. त्याचबरोबर या आर्थिक वर्षात कंपन्यांची आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती ब-यापैकी राहिली आहे. उद्योग तज्ज्ञांच्या मते, व्यवसायातील कामगिरी, उद्योगाचा उंच आलेख आणि उत्पादनातील विक्रमी वाढ या फुटपट्टीवर कंपनी वाढीचे मोजमाप करता येईल. पगार कपात, कमी पगार, कामाचे वाढलेले तास यासर्व कटकटींमुळे अनेक कर्मचा-यांनी राजीनामे देऊन दुस-या कंपन्यात, दुस-या नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. परिणामी कंपन्यांचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. आता हे नुकसान पगारवाढ देऊन थांबविण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत.

या अहवालानुसार पगारवाढीचा सर्वाधिक फायदा हा तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे. अशी अपेक्षा आहे की टेक कंपन्या वर्षाकाठी सरासरी 10.5% वाढ देऊ शकतात. त्यानंतर जीवनविज्ञान क्षेतातील कर्मचा-यांना भरघोस पगार मिळू शकतो. या क्षेत्रात सरासरी 9.5 टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

दरम्यान, सेवा, वाहन आणि रासायनिक क्षेत्रातील कंपन्या 9 टक्के इन्क्रिमेंट देऊ शकतात. या सर्वेक्षणात 786 कंपन्यांचा समावेश होता. त्यापैकी 60 टक्के कंपन्या मासिक वायफाय आणि युटिलिटी बिलांसाठी भत्ते देत आहेत. दुसरीकडे, 46% कंपन्या कर्मचा-यांना निरोगी आरोग्य ठेवण्यासाठीचे लाभ देत आहेत. केवळ 10% कंपन्या प्रवास भत्ता न देण्याचा अथवा तो कमी करण्याचा विचार करत आहेत.

Previous articleप्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोले- आज बापू की शिक्षा याद करने का दिन
Next articleअभिनेत्री काजोल कोरोनाच्या विळख्यात; म्हणाली- आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).