Home Covid-19 अभिनेत्री काजोल कोरोनाच्या विळख्यात; म्हणाली- आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू

अभिनेत्री काजोल कोरोनाच्या विळख्यात; म्हणाली- आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू

409

देशात कोरोनाच्या आलेखात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप अटळलेला नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतेच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. काजोलने आपली कोरोना टेस्ट केली असता, त्यात तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती स्वतः काजोल हिने दिली आहे.

काजोलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. स्वतःचा फोटो शेअर करण्याऐवजी काजोलने तिची मुलगी न्यासा देवगणचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

काजोलने इंस्टाग्राम पोस्ट केली असून, तिने स्वतःचा फोटो शेअर केलेला नाही. कारण तिचे लाल नाक कोणी पाहून नये, अशी तिची इच्छा आहे. त्याऐवजी, काजोलने तिची मुलगी न्यासाचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये न्यासाच्या हातावर सुंदर मेहंदी दिसत आहे. त्यासोबत काजोलने लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे आणि माझे लाल नाक कोणीही पाहू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू. मिस यु न्यासा.’ असे म्हणत काजोलने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

Previous articleSalary hike | पगारवाढीला अच्छे दिन! महामारीचा परिणाम ओसरला?
Next articleलता मंगेशकर कोरोनामुक्त; मात्र न्यूमोनियाची लक्षणे असल्याने आयसीयूत उपचार सुरू
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).