Home कोरोना सक्रिय रुग्णांपैकी 1.27% रुग्णालयांत, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.8%

सक्रिय रुग्णांपैकी 1.27% रुग्णालयांत, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.8%

437

कोरोना रुग्णसंंख्येत वाढ दिसत असली तरी यापूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प म्हणजे १.२७% आहे. गुरुवारपर्यंत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण १ लाख १४ हजार ८४७ असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे प्रमाण फक्त १ हजार ४६३ आहे. रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणातही तुलनात्मक वाढ दिसत असून सन २०२० व २०२१ च्या तुलनेत हा दर ९५ टक्के असा दिलासादायक दिसतो आहे.

गेल्या वर्षी ३ मे २०२१ रोजी राज्यातील एका दिवसातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ५६ हजार ८७० होती. त्या दिवशी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या २८ हजार ५९३ होती. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १० टक्के होते. त्यापूर्वी १३ सप्टेंबरला सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात २ लाख ९० हजार ३४४ झाली होती. त्या वेळी रुग्णालयातील भरतीचे प्रमाण २९ हजार १७८ म्हणजेे ४ टक्के होते. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ८४७ असून रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या १ हजार ४६३ आहे. हे प्रमाण फक्त १.२७ % आहे.

मार्च २०२० मध्ये कोविडच्या संसर्गास राज्यात प्रारंभ झाला होता. २८ मार्च २०२० या दिवशी राज्यात फक्त १४६ रुग्ण होते, मात्र बरे होणाऱ्यांचे प्रमाण फक्त १४.६ होते. नंतर मात्र, रुग्णसंख्येचे प्रमाण वाढत गेले असले तरी बरे होण्याच्या दरातही कायम सुधारणा दिसून आली. गेल्या वर्षीच्या लाटेत कोविड रुग्णांचा बरे होण्याचा दर ९२ ते ९३ टक्क्यांवर आला होता. या वेळी या प्रमाणात अधिक सुधारणा झाली असून कोविड रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.८ वर पोहोचले आहे.

Previous article@JnarddcMines | जेएनएआरडीडीसी के शिविर में 82 ने किया रक्तदान
Next article#Covid_19 | ज्या वेगाने रुग्ण वाढताहेत, त्याच वेगाने ते घटतीलही : तज्ज्ञांचे मत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).