Home मराठी @kvicindia | जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘खादी बाजार’ प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन

@kvicindia | जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘खादी बाजार’ प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन

492

नागपूर ब्युरो : सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग, नागपूर यांच्या वतीने खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री 6 ते 20 जानेवारी दरम्यान आकाशवाणी चौक, सरपंच भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच भवनात राज्यस्तरीय भव्य ‘खादी बाजार’ प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, 6 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले.

यावेळी खादी व ग्रामोद्योग आयोग, मध्य विभागाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक सुनील हिरणवार उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खादीचे महत्त्व सांगितले. नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग आयोग, नागपूरचे संचालक राघवेंद्र महिंद्राकर, सहायक संचालक (खादी) अजय कुमार आणि सहायक संचालक (ग्रामोद्योग) राजेंद्र खोडके यांनी केले आहे.

खादी बाजार प्रदर्शनाचा मुख्य उद्देश खादी संस्था आणि ग्रामोद्योगांशी संबंधित दुर्गम ग्रामीण भागातील कारागीर आणि विणकर, इतर कामगार आणि बेरोजगार युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे.

खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून देशभरात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आणि लहान घटकांना खादी बाजाराच्या माध्यमातून त्यांची उत्पादने विकण्याची संधी देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण कारागिरांच्या कौशल्याचा प्रसार व्हावा आणि देशभरातील शहरी लोकांना उत्पादने खरेदी करता यावीत या उद्देशाने गुरुवार, 6 ते 20 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय खादी मार्केट (प्रदर्शन आणि विक्री) आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous article@kvicindia | खादी की विश्वसनीयता और महत्व को पहचानें, खादी का उपयोग करें : आर. विमला
Next articleसोनिया ने मुख्यमंत्री चन्नी से कहा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के काफिले की सुरक्षा में चूक पर एक्शन लें
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).