Home कोरोना महाराष्ट्रात तीनच दिवसांत रुग्णसंख्येत 306 टक्क्यांची वाढ; संसर्ग दरही 0.5% वरून 6.1%...

महाराष्ट्रात तीनच दिवसांत रुग्णसंख्येत 306 टक्क्यांची वाढ; संसर्ग दरही 0.5% वरून 6.1% झाला

440

देशात ओमायक्रॉनमुळे आलेली कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणाबाहेर चालली आहे. देशात २८ डिसेंबरला फक्त ६,१४७ नवे रुग्ण आढळले होते. गुरुवारी ही संख्या १.१४ लाखावर गेला. म्हणजेच फक्त ११ दिवसांतच रोजचे नवे रुग्ण १७५८% वाढले. महाराष्ट्रात रुग्णसंख्या केवळ तीनच दिवसांत तिप्पट, तर दिल्ली, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये दुप्पट वाढली.

यापूर्वीच्या दोन्ही लाटांत कोणत्याही राज्यात नव्या रुग्णवाढीचा वेग इतका नव्हता. तथापि, दिलासादायक बाब म्हणजे आजवर कोणत्याही राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यात वाढ झालेली नाही. केरळात आधीच झालेल्या मृत्यूंचा आकडा रोज अपडेट केला जात आहे. यामुळे तेथे रोज २७० पेक्षा जास्त रुग्ण नोंदवले जात आहेत. इतर कोणत्याही राज्यात आजवर १५ पेक्षा जास्त मृत्यू होत नाहीत. केरळ वगळता संपूर्ण देशभरात रोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी आजवर ५० पेक्षाही कमीच आहे.

कोरोनाच्या स्थितीचा अंदाज टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटमुळे (संसर्ग दर) लागतो. या हिशेबाने पाहिले तर कोलकात्यात स्थिती सर्वात बिकट आहे. तेथे १०० चाचण्यांत ४९-५० रुग्ण आढळत आहेत. मुंबईतही जवळपास ३० रुग्ण आढळत आहेत.

इटलीहून पंजाबला आलेल्या १७९ पैकी १२५ प्रवासी बाधित : इटलीहून चार्टर्ड फ्लाइटने अमृतसरला आलेले १२५ प्रवासी बाधित आढळले आहेत. विमानात एकूण १७८ लोक होते. विमानात चढण्याआधी सर्व कोरोना निगेटिव्ह होते.

Previous articleपंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हात तर नाही ना? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Next article@JnarddcMines | जेएनएआरडीडीसी के शिविर में 82 ने किया रक्तदान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).