Home मराठी भाजयुमोने जाळला महाविकास आघाडीचा पुतळा

भाजयुमोने जाळला महाविकास आघाडीचा पुतळा

563

नागपुर ब्यूरो : भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ संदर्भात हस्तक्षेप करणारे विधेयक पारीत करण्याचे पाप केले आहे त्या विरोधात नागपुर विद्यापीठाच्या जुन्या प्रशासकीय इमारत, महाराजबाग येथे तीव्र निदर्शने करून महाविकास आघाडीचा पुतळा जाळण्यात आला.



या विधेयकात उच्च शिक्षण मंत्री स्वताःला उपकुलपतींचा दर्जा देतील, प्र-कुलगुरूंच्या दर्ज्याच्या पदावर बसतील व विद्यापीठाचे संपुर्ण अधिकार स्वताःच्या हातात घेतील अशी जी काही मनशा महाविकास आघाडीची आहे. विद्यापीठाच्या संदर्भात जे विधेयक विधानसभेत चर्चा सुरू असतांना संख्याबळाच्या जोरावर जबरदस्तीने पारीत करून घेतले. हे विधेयक विद्यार्थ्यांकरीता व विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप अतिशय घातक आहे. भारतीय जनता युवा मोर्चा हे कदापी सहन करणार नाही. उद्या जाऊन हे लोकं विद्यापीठाच्या जमीनी विकण्याचा ठाव खेळतील, बोगस डिग्री विकतील. जे सरकार साध्या परिक्षा घेऊ शकत नाही त्या सरकारची विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप करण्याची मनशा आहे. जेणे करून सर्व विद्यापीठांचे संपुर्ण अधिकार त्यांच्याकडे असावेत, विद्यापीठाचे संपुर्ण खाजगीकरण करून संपुर्ण माल आपल्या खिश्यात लोटायचा ते भायजुमो कदापी होऊ देणार नाही.

संपुर्ण महाराष्ट्रामध्ये आज नुसते आंदोलनाती लाट निर्माण झालेली आहे जर राज्य सरकारने हे विधेयक मागे घेतले नाही तर पुढे उग्र रूप धार करेल.

या आंदोलनाला प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वात, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामन तुर्के, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले, शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनीष मेश्राम, जिल्हा महामंत्री राहुल किरपान, कपिल गायधने, अंजली कानफाडे, शहर विद्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, बादल राऊत, पंकज सोनकर, शहर संपर्क प्रमुख सचिन सावरकर, वैभव चौधरी, युवती आघाडी संयोजिका डिम्पी बजाज, रोहित लोहिया सचिन सावरकर,शौनक जहांगीरदार, संकेत कुकडे,अमेय विश्वरूप, करण यादव,आशुतोष भगत, निरज दोंतुलवार ,चेतन धर्मीक, उदय मिश्रा, संदीपन शुक्ला, गौरव पांडे,संदीप सुपटकर, रोहित जाम्भले, रोहित पारवे, सागर घाटोले,अक्षय शर्मा,स्वप्निल खड्गी,वरुण गजभिए, शिवम पंढरीपांडे,रोहित फुलसुंगे,दिपेश यादव,गौरव पाठक,शुभंकर डबले,वेदांत जोशी,विशाल सिंह,रविकांत शाक्य,अनिकेत ढोले,विक्रांत येवतकर,अजय मेश्राम,मिलन वानखेड़े,प्रथम शिवहरे, देवेश पत्थे, विवेक तिरोडे,कौशिक हिरणवार,सागर पेठे,शुभम चौरेवार, स्वप्निल देवळीकर,कमलेश पांडे
आलोक मानकर, शरद भोयर, सचिन कांबडे, राहुल गायधने, मोहीत कक्कड, हरीश कंगाली, प्रदीप चिंदमवार,अमर नाडे,अर्जुन यादव, गौरव कटरे,अमन तोरीया,विक्रम गदरे,मयुर भुते,शरद सारवे,केदार देशपांडे,जतिन कांबळे, राखी मनवाटकर, शारू निमजे, सिमरन नंदूरकर, रीता गजबिए, अंजु उदासी, पल्लवी गिरोले व शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleकॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाच्या कामासाठी कालबद्ध आराखडा तयार करा
Next article#Nagpur | महा हैंडलूम की राज्यस्तरीय हैंडलूम प्रदर्शनी को व्यापक प्रतिसाद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).